म्हापसा: हळदोणे सरपंच प्रणेश नाईक यांच्यावरील हल्लाप्रकरणी चार संशयिताना सर्शत जामीन मंजूर झ्राला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश तथा म्हापसा येथील जलद गती न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्या चार संशयितांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जामिनावर आणि इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. हळदोणेचे सरपंच प्रणेश नाईक यांच्यावर झालेला अमानुष हल्ला तसेच खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 144, 147,148, 452 व 307 अंतर्गत विजय कारबोटकर व इतर सात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयितांना अटक केली होती व ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
कोणत्याही वेळी म्हापसा पोलिसांनी संपर्क साधल्यास संशयित स्थानकात पोहोचू शकतील या हेतूने व्हॉट्सअॅप सेवा असलेले मोबइल फोन नंबर सादर करणे , असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, संशयितांनी कोणत्याही साक्षीदारावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दबाव आणू नये; शिवाय, पुराव्यांबाबत छेडछाड करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी संशयित सोमेश मानसिंग, जावेद बळ्ळारी, चंद्रशेखर भोमकर व राकेश सुतार यांनी जलदगती न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अन्य दोन संशयितांना या पूर्वीच जामीन मंजूर झाला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने चारही संशयितांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जामिनावर व तितक्याच रकमेसह आणि इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.