Robbery: तिस्क-उसगाव येथील एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या

गोव्यातील एटीएम चोरीमध्ये आंध्र प्रदेशातील चोरट्यांचा सहभाग
ATM  Robbery
ATM RobberyDainik Gomantak

आंध्र प्रदेशात गेलेल्या पोंडा पोलिसांच्या पथकाने केलेल्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील गन्नावरम पोलीसांनी काही चोरट्यांना अटक केले आहे. याच चोरट्यांनी फोंडा येथील तिस्क-उसगाव येथे एटीएम लुटले आहे.

(ATM robbery in usgaon tisk ponda goa Andhra Pradesh police caught the 2 thieves)

ATM  Robbery
Goa Education|‘नवीन शैक्षणिक धोरणा’साठी 15 सदस्यीय सल्लागार समिती

मिळालेल्या माहितीनुसार 18 ऑगस्ट 2022 च्या पहाटे सहा मुखवटा घातलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने तिस्क येथील दोन वेगवेगळ्या बँकांची दोन एटीएम फोडले होते. दोन्ही एटीएम नंतर सुमारे एक किमी अंतरावर धारबांदोडा येथे फोडल्याची आढळले होते. परंतु यातील एक एटीएम तुटलेले आणि दुसरे अखंड होते. एचडीएफसी बँकेच्या एकाच मशीनमधून चोरट्यांनी 13.37 लाख रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला होता.

ATM  Robbery
CM Pramod Sawant|...बोला ‘प्रमोद’जी बोला!

अशाच पद्धतीने आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील गन्नावरममध्ये एटीएम लुटण्याचा आणखी एक प्रयत्न झाला होता. मात्र एका पोलीस हवालदाराने मशीन लुटण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. या टोळीने पोलीस हवालदारावर हल्लाही केला होता.

सहा जणांच्या टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात आंध्र प्रदेश पोलिसांना यश आले आहे.तर यातील चौघे फरार आहेत. अटक केलेले दोघे गन्नावरम पोलिसांच्या ताब्यात असून. फोंडा पोलिसांनी पुढील तपासासाठी आरोपींना गोव्यात आणणार असल्याचे सांगितले आहे.

तिस्क - उसगाव येथे नेमके काय झाले होते ?

तिस्क - उसगाव येथे 18 ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. यात चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली.

या एटीएम 13.37 लाख रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी ही दोन्ही मशीन ताब्यात घेतली असून त्याच्यावरुन हाताचे ठसे किंवा अन्य काही पुरावे मिळतात का याचा शोध पोलीस घेत होते. या चोरीतील 2 चोरटे आता पोलीसांच्या हाती लागले आहेत. तर अद्याप 4 हाती लागलेले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com