Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak

Indian Super League: एटीके मोहन बागानही ‘प्ले-ऑफ’मध्ये

आयएसएल फुटबॉल: केरळा ब्लास्टर्सला नमवून तिसऱ्या स्थानी
Published on

Indian Super League एटीके मोहन बागानने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीत जागा मिळविताना रविवारी केरळा ब्लास्टर्सला 2-1फरकाने नमविले. कोलकाता येथे घरच्या मैदानावर पिछाडीवरून विजय साकारत त्यांनी गुण तक्त्यात तिसरे स्थान मिळविले.

सामन्यात दोन गोल करणारा कार्ल मॅकह्यू एटीके मोहन बागानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अनुक्रमे 23 व 71 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या १६व्या मिनिटास दिमित्रोस दियामांताकोस याने केलेल्या गोलमुळे केरळमधील संघाने आघाडी प्राप्त केली होती.

उत्तरार्धात केरळा ब्लास्टर्सला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांच्या के. पी. राहुल याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे 64 व्या मिनिटास मैदान सोडावे लागले. प्रतिस्पर्ध्यांचा एक खेळाडू कमी झाल्याची संधी एटीके मोहन बागानने साधली.

Indian Super League
Sport News: जीव्हीएम, डीएम्स महाविद्यालयाला बेसबॉलमध्ये विजेतेपद

एटीके मोहन बागानचा हा 19 सामन्यांतील नववा विजय ठरला. त्यांचे 31 गुण झाले असून +5 गोलफरकासह तिसऱ्या स्थानी उडी घेतली. बंगळूर एफसी व केरळा ब्लास्टर्सचेही 31 गुण झाले आहेत, मात्र गोलसरासरी कमी असल्यामुळे त्यांना अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळाला. हे दोन्ही संघ यापूर्वीच प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरले आहेत. केरळा ब्लास्टर्सचा हा 19 लढतीतील आठवा पराभव ठरला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com