कळंगुट-कांदोली परिसरात जवळपास 100 बेकायदेशीर वाईन शॉप

ऑल इंडिया लिकर ट्रेडर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांचा आरोप
कळंगुट-कांदोली परिसरात जवळपास 100 बेकायदेशीर वाईन शॉप
Published on
Updated on

कळंगुट-कांदोली (Calangute-Candolim) परिसरात जवळपास 100 बेकायदेशीर वाईन शॉप असल्याचा आरोप ऑल इंडिया लिकर ट्रेडर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी केला आहे. राज्याचा अबकारी विभाग डोळे झाकून बसला आहे. बेकायदा शॉपवर कारवाई करण्याची विभागाची ईच्छा असेल तर, कळंगुट-कांदोली परिसरातील बेकायदेशीर वाईन शॉप दाखवून देईन असे दत्तप्रसाद नाईक यांनी म्हटले आहे.

कळंगुट-कांदोली परिसरात जवळपास 100 बेकायदेशीर वाईन शॉप
अल्पवयीने मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, एकाला अटक

गोव्यात परराज्यातील नागरिकांना मद्य विक्रीचा परवाना मिळत नाही. त्यासाठी संबधित व्यक्ती 25 वर्षे गोव्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. मागील दहा वर्षात बेकायदेशीरपणे परवाने दिल्याने, अवैध मद्य विक्री वाढली आहे. विशेषत: पर्यटन हॉटस्फॉट असलेल्या कळंगुट-कांदोली परिसरात हे प्रमाण अधिक असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.

कळंगुट-कांदोली, कोलवा (Colva) आणि उत्तर गोव्यातील (North Goa) इतर भागात हे प्रकार अधिक आहेत. असा व्यवसाय करणारे दोन ते तीन वर्ष एका ठिकाणी अवैध पद्धतीने व्यवसाय करतात आणि नंतर फरार होतात. सरकारला देखील ते कसल्याही प्रकरचा कर देत नाहीत, त्यामुळे त्यांचा नफा आमच्यापेक्षा अधिक असतो. असे नाईक म्हणाले. तसेच, याबाबत सरकारने दुर्लेक्ष करून, वेळीच उपाययोजना न केल्यास येत्या काळात त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही. असेही नाईक यांनी म्हटले आहे.

कळंगुट-कांदोली परिसरात जवळपास 100 बेकायदेशीर वाईन शॉप
Amit Patkar : मायकल लोबो कुठे जातात; त्यांनाच विचारा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com