Assagao: आसगाव कोमुनिदादच्या जमीन दस्तावेजांत फेरफार, ‘टोम्बो वही’चे पान गायब; 4 मालमत्तांमधील जागा हडपण्याचा प्रयत्न

Assagao comunidade land scam: एकूण चार मालमत्तांत हा फसवणुकीचा व जमीन हडप करण्याचा प्रकार संशयितांकडून झाल्याचा आरोप या कोमुनिदादचे ॲटर्नी नेल्सन फर्नांडिस यांनी केला.
Assagao comunidade land scam
Assagao comunidade land scamDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: आसगाव कोमुनिदादच्या मालकीच्या पोर्तुगीजकालीन दस्तऐवजात खोटेपणा तसेच कोमुनिदादच्या टोम्बो वहीचे (जमिनींची नोंदवही) पान फाडून आणि इतर कागदपत्रांमध्ये फेरफार करून तब्बल १ लाख ६४ हजार चौरस मीटर जागा हडप करण्याचा प्रकार घडला आहे.

एकूण चार मालमत्तांत हा फसवणुकीचा व जमीन हडप करण्याचा प्रकार संशयितांकडून झाल्याचा आरोप या कोमुनिदादचे ॲटर्नी नेल्सन फर्नांडिस यांनी केला. या चारही प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गुरुवारी (ता.११) सायंकाळी आसगाव कोमुनिदादच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत फर्नांडिस बोलत होते. यावेळी आसगाव कोमुनिदादचे अध्यक्ष रुइल्दो डिसोझा, इआन डिसोझा, जेराल्ड डिसोझा व अ‍ॅड. अभिजीत नाईक हे उपस्थित होते.

नेल्सन फर्नांडिस म्हणाले की, पहिल्या जमीन हडप प्रकरणात संशयित सुदेश व सुप्रिया यांनी आसगावमधील १ लाख चौरस मीटर जागेतील आसगाव कोमुनिदादच्या कागदपत्रांत कथित फेरफार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. याला कोमुनिदादने विरोध करून, याप्रकरणी ‘एसआयटी’कडे मार्च २०२३मध्ये तक्रार केली होती.

दुसऱ्या प्रकरणात, आसगाव कोमुनिदादच्या मालकीची १८,६०० चौरस मीटर जागा अशाचप्रकारे लाटण्याचा प्रयत्न झाला.

संशयित वनिता व शिवशंकर यांचा यामागे हात असल्याचा आरोप नेल्सन फर्नांडिस यांनी केला. या संशयितांनी आसगावमधील वरील जागा फसवणूक करून हस्तांतरित केली.

तसेच संशयितांनी एका अभियांत्रिकी विद्यालयाला दानधर्म केलेल्या जागेत हस्तक्षेप केला. कोमुनिदादने वरील अभियांत्रिकी विद्यालयाला दान केलेल्या ३,८२५ चौरस मीटर जागेवर संशयितांनी दावा करीत, वरील विद्यालयाविरुद्ध संशयितांनी खोटी तक्रार दाखल केली, असा आरोप नेल्सन फर्नांडिस यांनी केला.

तिसऱ्या घटनेत, आसगाव कोमुनिदादची ५,२६० चौरस मीटर जागा संशयित यशवंत, मीनाक्षी व इतरांनी कोमुनिदाद कोमुनिदादचे नाव, या सर्व्हे क्रमांकामधून कथितरित्या काढून टाकले. याप्रकरणी कोमुनिदादने संबंधितांच्या म्युटेशन प्रक्रियेला सब-रजिस्ट्रारसमोर विरोध केल्याची माहिती नेल्सन यांनी दिली.

तर चौथ्या प्रकरणात, संशयित यशवंत सावंत यांनी कोमुनिदादची ४४,७४० चौरस मीटर जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही नेल्सन यांनी केला.

Assagao comunidade land scam
Assagao Land Scam: 13 गुन्हे, 14 वेळा अटक! जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड 'महंमद'च्या पुन्हा आवळल्या मुसक्या

या मालमत्तेची कोणीही खरेदी न करण्याचा फर्नांडिस यांचा सल्ला!

पोर्तुगीज काळातील टोम्बो वहीतील (जमिनींची नोंदवही) एक पान गायब आहे. ज्यावेळी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून या जमीन हडप प्रकरणाची कागदपत्रे तपासली जात होती, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या गायब पानाच्या आधारेच संशयितांनी वरील आसगाव कोमुनिदादची जागा आपली असल्याचा खोटेपणा करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा नेल्सन फर्नांडिस यांनी केला.

Assagao comunidade land scam
Assagao Incident: उघड्या विहिरीत पडून 54 वर्षीय व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू, आसगावातील धक्कादायक घटना; स्थानिकांमध्ये संताप

२०१९नंतर या आसगाव कोमुनिदादचा मी पदभार स्वीकारला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. आमच्या नोंदवही कार्यालयातील कपाटामध्ये असतात. याची चावी कारकुनाकडे असते. त्यामुळे नेमका हा प्रकार कसा घडला किंवा संशयितांनी नोंदवहीतील पाने कशाप्रकारे गायब केली. याचा शोध तपास यंत्रणांनी घ्यावा. टोम्बो वही आम्ही एसआयटीकडे दिली. या वहीतील सर्व मजकूर हा पोर्तुगीज भाषेत लिहिलेला आहे. तसेच काही खोटे पोतुगीजकालीन दस्तऐवज तयार केल्याचे हस्तलेखन तज्ज्ञाकडून आम्ही ओळखले, असा दावा नेल्सन फर्नांडिस यांनी केला.

मुळात ही जागा आसगाव कोमुनिदादची आहे. तिसरी व्यक्ती या जागांवर दावा करू शकत नाही. त्यामुळे वरील संशयितांकडून कोणीही जागा खरेदी किंवा व्यवहार करू नये. अन्यथा अशा खोटारड्या लोकांशी हातमिळवणी करून मालमत्ता खरेदी करणारेच आर्थिकरित्या अडचणीत येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com