Asphalt alternative road in borda
Asphalt alternative road in bordaDainik Gomantak

'बोर्डेतील पर्यायी रस्त्याचे डांबरीकरण करा'

वाहनचालकांची मागणी: नाईकनगर मार्ग असुरक्षित
Published on

डिचोली: राज्य महामार्गाअंतर्गत डिचोलीतून जाणाऱ्या बगलमार्गावरील (बायपास) ‘बोर्डे’ भागात पूल (ओव्हरब्रीज) बांधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याचे पावसाळ्यापुर्वी डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

राज्य महामार्गाअंतर्गत डिचोलीतील व्हाळशीहून वाठादेवपर्यंत सुमारे नऊ किलोमीटर लांबीच्या बायपास रस्त्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या बायपासच्या मार्गात बोर्डे व पिराचीकोंड येथे मिळून दोन ठिकाणी पूल उभारण्यात येणार आहेत. सध्या बोर्डे येथील पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी बोर्डे येथे स्मशानभूमीजवळ पारंपरिक रस्ता बंद करण्यात आला आहे. रस्ता बंद करून नाईकनगरमार्गे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. पण, हा रस्ता मातीचा आणि असुरक्षित ठरत आहे. या रस्त्याने नियमित ये-जा करणाऱ्यांना धूळ प्रदूषण आदी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com