Ashtami Jatra: मसणदेवीची जत्रा उत्साहात; नार्वेत भक्तांची गर्दी

अनेकांनी फेडले नवस; 105 वर्षांची परंपरा
Narve Bicholim Masandevichi Jatra
Narve Bicholim Masandevichi JatraDainik Gomantak

Narve Bicholim Masandevichi Jatra: सुमारे 105 वर्षांची परंपरा असलेली तळेवाडा-नार्वे येथील प्रसिद्ध मसणदेवीची जत्रा मंगळवारी (ता.५) पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ही जत्रा साजरी होते.

या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा फक्त दिवसाच साजरी करतात. रात्रीच्यावेळी या परिसरात भुतांचा वावर असल्याची भक्तांची भावना आहे. त्यामुळे काळोख पडू लागल्यानंतर याठिकाणी कोणीच थांबत नाही. दुकानांची फेरीही हटवली जाते.

मसणदेवीची जत्रा गोव्यासह अन्य राज्यातही प्रसिद्ध आहे. यंदाही वेगवेगळ्या भागातील शेकडो भक्तगणांनी श्री मसणदेवीचे दर्शन घेऊन देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तगणांनी आपले नवसही फेडले.

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही सकाळी देवीचे दर्शन घेतले. जत्रेनिमित्त यंदाही खाजे, खेळणी, चणे आदी वस्तूंच्या स्टॉल्सची फेरी भरली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागासह पोलिसही तैनात होते.

Narve Bicholim Masandevichi Jatra
CM pramod Sawant: शिक्षक घडवितात भावी पिढी

काजऱ्याचे वैशिष्ट्य

तळेवाडा-नार्वे येथे मसणदेवीचे छोटे मंदिर असून समोर एक पेड आहे. त्याठिकाणी काजऱ्याचा मोठा वृक्ष असून एखादी महिला रजस्वला अवस्थेत किंवा गरोदर असताना मृत झाल्यास तिला या परिसरात आणून पुरले जाते.

अवगतीपासून बाधा होऊ नये म्हणून तांब्याच्या नाण्यासहित एक खिळा या काजऱ्याच्या झाडाला ठोकण्याची परंपरा आहे. त्यामुळे मृतात्म्यांना त्रास होत नाही. त्यांना मुक्ती मिळते, अशी या देवस्थानची आख्यायिका आहे.

जत्रेची आख्यायिका

श्री मसणदेवी म्हणजे नवस किंवा मनोकामना पूर्ण करणारी देवी, अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच या जत्रेला मोठी गर्दी लोटते. ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, त्यांनी नवस केल्यास तो पूर्ण होतो.

हे अतिशय जागृत देवस्थान असून इतर राज्यांतूनही लोक दर्शनाला येतात, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गजानन शेट नार्वेकर यांनी दिली़

Narve Bicholim Masandevichi Jatra
Sancoale News: सांकवाळ अपघातप्रवण क्षेत्र वाहतुकीस धोकादायक; खंडपीठाच्या सूचना

बकरा मारण्याची प्रथा बंद

या ठिकाणी सजवण्यात आलेल्या मूर्तीची भाविक खणानारळाने ओटी भरतात. काही लोक नवसाप्रमाणे पाळणे वाहतात.

संपूर्ण दिवसभर भक्तांनी देवदर्शन घेतल्यावर पूजन करून बकरा सोडण्यात येतो. पूर्वी बकरा मारण्याची पद्धत होती. मात्र, कालांतराने ती प्रथा बंद झाली, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com