डिचोली शांतादुर्गा देवस्थानात आज आषाढी एकादशी उत्‍सव

गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात उद्या रविवारी आषाढी एकादशी विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त चोवीस तास अखंड भजनी सप्ताह होणार आहे.
Shantadurg Devsthan Bicholim
Shantadurg Devsthan BicholimDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली : गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात उद्या रविवारी आषाढी एकादशी विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त चोवीस तास अखंड भजनी सप्ताह होणार आहे.

श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी देवीस अभिषेक आदी विधी पार पाडल्यानंतर देवीची सजावट करण्यात येणार आहे. दुपारी 12 वा. चार चौगुले ग्रामस्थ गावकर मंडळीकडून समई प्रज्वलित करून अखंड भजनी सप्ताहाला प्रारंभ होणार आहे.

सोमवारी दुपारी 12.30 वा ग्रामस्थ गावकर, भाविक व महिला दिंडी पथकासह श्री विठ्ठलनामाच्या गजराने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून मंदिरात आल्यानंतर पुजाऱ्यांकडून देवीस व पंचायतन देवदेवतांना नैवेद्य, आरती, गाऱ्हाणे व तीर्थप्रसाद होणार आहे. रात्री 7.30 वा. पुराण वाचन, धुपारती आदी विधी झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.

भजनी सप्ताह

चोवीस तास चालणाऱ्या भजनी सप्ताहात ग्रामस्थ गावकर, स्वरगंधा सांस्कृतिक कला संस्था बालभजनी मंडळ, चोडण,श्री म्हात्राई महिला भजनी मंडळ, श्री शांतादुर्गा महिला दिंडी मंडळ, सुरज सहकारी आणि भजन मंडळ, गावकरवाडा बाल हौशी घुमट आरती मंडळ, स्थानिक भजनी कलाकार, श्री शांतादुर्गा महिला दिंडी मंडळ आणि आनंदी महिला भजनी मंडळातर्फे भजन सादर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com