गोव्यात आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी!

शांतीनगर वास्को येथेही श्री विठ्ठल रखुमाई संस्थानात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.
Ashadi Ekadashi celebrated in a devotional atmosphere in Goa
Ashadi Ekadashi celebrated in a devotional atmosphere in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्कोत आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासून विविध धार्मिक विधी, तद्नंतर रात्री श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला. आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगवाडी ब्रह्मस्थळ संस्थान श्री विठ्ठल रुक्माई देवस्थानात यजमान श्री महेंद्र बांदेकर यांच्या यजमान पदाखाली विविध धार्मिक विधी संपन्न झाली.

(Ashadi Ekadashi celebrated in a devotional atmosphere in Goa)

Ashadi Ekadashi celebrated in a devotional atmosphere in Goa
धक्कादायक; नयबाग येथे आढळला लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह!

दुपारी महाआरती तसेच संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. यात नामवंत भजनी कलाकार अशोक मांजरेकर, सुरेश वेळगेकर, तातू गावडे, महेंद्र पार्सेकर, शशिकांत उजगावकर यांनी भाग घेतला. नंतर रात्री श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मंदिरात आल्यानंतर आरती व तीर्थप्रसादाने संपूर्ण दिवसाच्या उत्सवाची सांगता झाली. शांतीनगर वास्को येथेही श्री विठ्ठल रखुमाई संस्थानात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शेकडो भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन कृपाप्रसादाचा लाभ घेतला.

दरम्यान रवींद्र भवन बायणा वास्कोतर्फे आषाढी एकादशी निमित्त हरी विठ्ठल अभंगवाणी या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र भवनाच्या मिनी सभागृहात केले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक कलाकार प्रचला आमोणकर व डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी अभंगवाणी सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. या गायक कलाकारांना दतराज सुर्लकर (ऑर्गन), शैलेश गावकर (तबला), किशोर तेली (पखवाज), योगेश रायकर (तालवाद्य) संगीत साथ केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com