Ashadhi Ekadashi 2023 : वाळपईत चिमुकल्यांचा पालखी सोहळा रंगला

काॅलनीतील नागरिकांनी पालखी व विठ्ठलाची पूजा केली.
Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023 Dainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi : वाळपई शिक्षण संस्था संचलित श्री हनुमान विद्यालयातर्फे बुधवारी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुलांनी शाळेकडून वाळपई शहरात दिंडी काढली, तसेच श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात दिंडी नाचवत नेली. नंतर श्रीराम काॅलनीत ही दिंडी नेण्यात आली. यावेळी काॅलनीतील नागरिकांनी पालखी व विठ्ठलाची पूजा केली.

त्यानंतर शाळेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरहरी हळदणकर, मुख्याध्यापिका सुविधा बर्वे, सपना सामंत यांनी दीप प्रज्वलन व विठ्ठलाची पूजा केली. यावेळी मुलांनी नृत्य सादर केले.

Ashadhi Ekadashi 2023
Valpoi : भूमिगत केबलचा ‘दाबोस’ला होणार लाभ; लवकरच कामाला प्रारंभ!

शिक्षक विष्णू जोशी यांनी एकादशीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालक-शिक्षक संघासह शिक्षिका मंजुळा नाईक, रूपा वझे, सत्यवान गावकर, सुधीर गावकर, संजीवनी गावकर, शुभदा बर्वे, दिव्या गावकर, विश्वास कवळेकर, विजयकुमार पाटील, पांडुरंग गावकर, प्रशिला शिरोडकर यांनी पुढाकार घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com