Mayem News: मये पंचायत क्षेत्रातील शेती धोक्यात, मिरची- भात पिकावर 'पाणी'

शेतकरी चिंताग्रस्त : मिरची, भाजी पिकावर खाऱ्या पाण्याचे संकट
Mayem News
Mayem NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mayem News मये पंचायत क्षेत्रातील भावकई येथील खाजन बांधाला पुन्हा भगदाड पडल्याने प्रचंड प्रमाणात नदीचे खारे पाणी शेतीत घुसत आहे.

यामुळे शेती धोक्यात आली असून, जवळपास 60 शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे मिरची, भाजी पिकाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. आ

श्चर्याची बाब म्हणजे आठ दिवसांपूर्वीच भगदाडाची दुरुस्ती करताना ते बुजविण्यात आले होते. मात्र, लगेचच पुन्हा बांध फुटल्याने दुरुस्तीकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे.

बांधाला पुन्हा भगदाड पडल्याने आधीच नुकसानीचा तडाखा बसलेले शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

भावकई खाजनबांधाला गेल्या सप्टेंबर महिन्यात खावटे पडल्यानंतर खरीप भातपीक कापणीच्यावेळी शेतीत खारे पाणी घुसले आणि हातातोंडाशी घास येण्याअगोदरच भातपिकाची नासाडी झाली, अशी माहिती देविदास गावकर आणि अन्य शेतकऱ्यांनी दिली.

या समस्येकडे भावकई खाजन शेतकरी कूळ संघटना किंवा अन्य संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष घातले नसल्याने भात पिकापाठोपाठ यंदा मिरची, हळसांदा, भाजी पीक धोक्यात आले.

उरल्यासुरल्या आशा मावळल्या

बांधाला खावटे पडल्याने भरतीच्यावेळी नदीचे पाणी बाहेर फुटून शेतीत घुसत आहे. खारट पाणी घुसल्याने येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेली मिरची आणि हळसांदा करपून जात आहे.

आतापर्यंत 50 टक्क्यांहून अधिक मिरची आणि भाजीचे मळे करपून गेले आहेत. आता पुन्हा खावटे पडल्याने उरल्यासुरल्या आशाही मावळल्या आहेत, अशी व्यथा अमर गावकर आदी शेतकऱ्यांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com