Hotels In Goa: कोलवातील सात हॉटेल्सना दणका

Hotels In Goa: कोलवातील तीन रेस्टॉरंट, तीन कॅफे व एक बार मिळून सात हॉटेल्सना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीसीबी) दणका दिला.
Hotels In Goa
Hotels In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Hotels In Goa: कोलवातील तीन रेस्टॉरंट, तीन कॅफे व एक बार मिळून सात हॉटेल्सना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीसीबी) दणका दिला.

जल व हवा (प्रदूषणाच्या प्रतिबंध व नियंत्रण) कायद्यानुसार या हॉटेल्सना कन्सेट टू ऑपरेटचा परवाना नसल्याने ती त्वरित बंद करण्याचा आदेश मंडळाचे सदस्यसचिव शमिला मोन्तेरो यांनी जारी केला आहे.

Hotels In Goa
National Games 2023 Goa: अन्‌ क्रीडा क्षेत्र बहरू लागले!

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई झालेल्या सर्व हॉटेल्सना 22 जुलै 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी कन्सेट टू ऑपरेटचा परवाना नसल्याचे सूचित केले होते.

या नोटिसीला कोणीही उत्तर दिले नव्हते. त्यामुळे मंडळाच्या झालेल्या बैठकीत या नोटिसीसंदर्भात चर्चा होऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाई केलेल्या हॉटेल्समध्ये मे. कोलकत्ता हॉटेल अँड रेस्टॉरंट, मे. राधा कृष्ण रेस्टॉरंट, मे. कियास कॅफे, मे. लिटल तनिष्क सी फूड रेस्टॉरंट, मे. गुडमॅन बार अँड रेस्टॉरंट, मे. अरुण कॅफे, मे. अतुल कॅफे यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mapusa Bill Dispute Violence
Goa Hotel Industry Crisis
Commercial LPG Price Hike
Goa Fire Incident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com