Arvind Kejriwal Code of Conduct Violation Case
Arvind Kejriwal Code of Conduct Violation CaseDainik Gomantak

आचारसंहिता उल्लंघन प्रकरण: सुनावणी पुन्हा तहकूब..! 'या' तारखेला अरविंद केजरीवालांना म्हापसा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
Published on

Arvind Kejriwal Code of Conduct Violation Case

आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज (5 जानेवारी) न्यायालयात सुनावणीवेळी प्रत्यक्षात हजर राहण्यास सूट देण्यात आली. अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी न्यायालयात केजरीवालांची बाजू मांडली. पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Arvind Kejriwal Code of Conduct Violation Case
Leopard in Borim: बोरीतील गल्लीबोळात बिबट्याचा खुलेआम वावर! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पहा व्हिडिओ

याबाबत माहिती देताना अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल राज्यसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. तसेच ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठीही दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर राहता आले नाही.

यासाठी माननीय न्यायालयाकडे आम्ही सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यानुसार येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत सदर सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीवेळी केजरीवाल यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

'या' कारणास्तव केजरीवालांना समन्स

उपलब्ध माहितीनुसार, 2017 मध्ये म्हापसा टॅक्सी स्टँडवर झालेल्या आपच्या प्रचार सभेवेळी केजरीवाल यांनी वादग्रस्त विधान केले होते. केजरीवाल म्हणाले होते की, सर्वांकडून पैसे घ्या मात्र मतदान आप पक्षाला मतदान करा असे ते त्यावेळी म्हणाले होते. या वक्तव्याची दखल घेत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार हे प्रकरण न्यायालयात गेले आणि आता केजरीवाल यांना याप्रकरणी समन्स जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com