Union Budget 2026: "अर्थसंकल्पात गोमंतकीयांची पार निराशा, युवा वर्ग हताश"! केजरीवालांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

Arvind Kejriwal On Budget 2026: युवा वर्गाची सध्या रोजगारावरून भलावण सुरू असून आम आदमी पक्षाचे सरकार गोव्यात क्रांतिकारी निर्णय घेऊ शकते, असे केजरीवाल म्हणाले.
Arvind Kejriwal On Budget 2026
Arvind Kejriwal On Budget 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामुळे महागाईचा आणखी भडका उडणार असून बेरोजगारी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांमुळे भाजप सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

कवळे येथील श्री शांतादुर्गा देवीचे दुपारी दर्शन घेतल्यानंतर केजरीवाल पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री आतिषी, आम आदमी पक्षाचे गोवास्थित नेते वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे आणि इतरांची उपस्थिती होती.

केजरीवाल म्हणाले की, अर्थसंकल्पात गोमंतकीयांची पार निराशा झाली आहे. गोव्यासाठी कोणतीही घोषणा केलेली नाही. या अर्थसंकल्पामुळे महागाईत आणखीनच वाढ होईल, असे केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal On Budget 2026
Budget 2026: सामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार? काय स्वस्त अन् काय महाग होणार? जाणून घ्या बजेटशी संबंधित मोठ्या अपेक्षा

गोव्यात अनेक समस्या भेडसावत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पाणी, रस्ते आदी सुविधा उपलब्ध नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. भाजपच्या घोषणा केवळ कागदावरच राहतात. प्रत्यक्षात मात्र कोणतीच कार्यवाही होत नाही. युवा वर्गाची सध्या रोजगारावरून भलावण सुरू असून आम आदमी पक्षाचे सरकार गोव्यात क्रांतिकारी निर्णय घेऊ शकते, असे केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal On Budget 2026
Union Budget 2026: कॅन्सर अन् शुगरची औषधे होणार स्वस्त, सर्वसामान्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; औषध निर्मितीसाठी 10 हजार कोटींचा 'बूस्टर डोस'!

गोव्यात प्रचंड बेरोजगारी!

गोव्यात सध्या बेरोजगारी सतावते आहे. युवकांच्या हातांना काम नाही. रोजगाराचा पत्ताच नाही. रोजगारासाठी भाजप सरकारकडे कोणतीही ‘ब्ल्यू प्रिंट’ नाही. त्यामुळे युवा वर्ग हताश झाला आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com