Rudreshwar Temple: रुद्रेश्वर पालखी गोंधळ प्रकरण! भंडारी समाज पुन्हा एकवटणार

Arvalem Rudreshwar Temple:हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वराच्या पालखी उत्सवावेळी झालेल्या गोंधळ प्रकरणी दोन गटात झालेली तडजोड भंडारी समाजाने फेटाळली आहे.
Rudreshwar Temple
Rudreshwar TempleDainik Gomantak

Arvalem Rudreshwar Temple

हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वराच्या पालखी उत्सवावेळी झालेल्या गोंधळ प्रकरणी दोन गटात झालेली तडजोड भंडारी समाजाने फेटाळली आहे.

देवस्थान समितीने कसली तडजोड केली, त्या दुसऱ्या गटाकडून मंदिरात पुन्हा येऊन काही वावगे करणार नाही हे लिहून घेतले का, याची विचारणा आता भंडारी समाजाकडून समितीला केली जाणार आहे. यासाठी आज (गुरुवारी) सायंकाळी मंदिर परिसरात भंडारी समाज बांधव एकवटणार आहेत.

आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक अॅड. अमित पालेकर यांनी याची माहिती दिली. ते म्हणाले, दुसऱ्या गटाने कृषिमंत्री रवी नाईक यांचे नाव घेऊन काय ते दाखवतो, अशी भाषा वापरलेली आहे. पालखी उत्सवावेळी आम्ही जमणार हे सर्वांना ठाऊक होते.

आम्ही कोणाला विरोध करण्यासाठी तेथे गेलो नव्हतो तर आमच्या आराध्य दैवताच्या उत्सवासाठी जमलो होतो. पालखी उत्सवावेळी पालखी खेचून घेण्याचा प्रयत्न तेथे दांड्याला खिळे लावून आलेल्या काही जणांकडून झाला. त्यांनी दगडफेक केली.

महिलांना मारहाण केली. हे सारे पोलिसांसमक्ष घडले आहे. पोलिस बूट घालून मंदिरात आले होते.

पोलिसांनी खरेतर हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवणे आवश्यक होते. तशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केल्यावर ते तक्रार मागत राहिले. आता तर प्रकरण मिटवल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Rudreshwar Temple
NCB Goa: सराईत नायजेरीयन ड्रग्ज तस्कर स्टॅनलीसह त्याच्या पत्नीची 1.06 कोटींची मालमत्ता जप्त

राज्यभरातील पाच लाख भंडारी बांधवांना मंदिर परिसरात झालेला प्रकार आवडलेला नाही. राजकीय वरदहस्ताशिवाय असे घडणे शक्य नाही, हे त्यांना कळून चुकले आहे.

यासाठी समितीने कसा समझोता केला हे जाणून घेण्यासाठी भंडारी बांधव एकत्र येणार आहेत, असे पालेकर यांनी सांगितले.

दरम्यान, या विषयावरून गेले दोन दिवस भंडारी समाजाच्या बैठका सुरू आहेत. हा विषय संपवण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू झाल्याची भावना झाल्याने त्याला जाब विचारण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात येत आहे.

त्याचा पहिला टप्पा म्हणून आधी श्री देव रुद्रेश्वर देवस्थानच्या समितीकडून जाणून घेण्याचे ठरवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com