Goa Culture: ग्रामीण कला व सांस्कृतिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून या पारंपरिक कलेला एक वेगळ्या प्रकारची गती प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन पर्ये आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी केले.
ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्था, वाळपई, कला आणि संस्कृती संचालनालय पणजी आणि ग्रामपंचायत भिरोंडा सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणावर आयोजित स्व. रामा राघोबा धुरी स्मृती 13 वा रणमाले महोत्सवाचाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी स्वागताध्यक्ष तथा भिंरोडा सरपंच उदयसिंग राणे, नगरगाव जिल्हा पंचायत सभासद राजश्री काळे, ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्था अध्यक्ष अंकुश धुरी, सचिव प्रकाश गावकर, माजी अध्यक्ष रघुनाथ धुरी, उपसरपंच मनिषा पिळ्येकर, रंजना राणे, रूपाली गावकर, विदेश नाईक, किरण गावडे, बाबुराव गावडे, फादर अग्नेलो, कला आणि सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक अशोक परब उपस्थित होते.
दिव्या राणे म्हणाल्या, रणमाले हे लोकनाट्य शिगमोत्सवाच्या दिवशी गावाच्या मांडावर खेळण्याची परंपरा खास करून गोव्यात सत्तरी, सांगे आणी कर्नाटक राज्यातील खानापूर भागात बघायला मिळते. हल्लीच्या युगात मनोरंजनाची वेगवेगळी साधने उपलब्ध असल्यामुळे रणमाले, गावनकाणी, माळेगान व भरनुल सारख्या लोककला उपेक्षित राहिल्या.
पूर्वजांची ही कला शाबूत ठेवणे ही आजच्या युवा पिढीचे कर्तव्य आहे. नव्या पिढीला या पारंपरिक रणमाले कलेची ओळख असणे ही काळाची गरज आहे. याबद्दल त्या जीवनशैलीचे धक्के आपल्या संस्कृती व परंपरेवर होणार नाही याची दक्षता आजच्या तरुण पिढीने घेणे अत्यंत गरजेचे आहे.
रणमाले ही आपल्या ज्येष्ठानी संवर्त के ले ली महत्त्वाची कला आहे. रणमाले महोत्सवाच्या माध्यमातून या कलेला चांगले दिवस आले ले आहेत. तरुण पिढी ही कला आपल्या खांद्यावर घेत आहे.
दरम्यान, वांते येथील दुर्गा महिला मंडळतर्फे उत्कृष्ट समई नृत्य सादर करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याचा आला. सत्कार मूर्तींची ओळख वासुदेव गावकर व झिलु गावकर यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता गावकर यांनी तर शेवटी प्रकाश गावकऱ यांनी आभार मानले.
सहा महिन्यांत रविद्र भवनचे स्वप्न प्रत्यक्षात
राणे म्हणाल्या, सत्तरी ही कलाकारांची खाण करुन कलाकारांना चांगल्या दर्जाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रवींद्र भवन सारखी संकल्पना साकार होणे गरजेचे आहे. येत्या सहा महिन्यात रविंद्र भवनाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. यासाठीचा सोपस्कार लवकरच पूर्ण केले जाणार असून मुख्यमंत्री सावंत व गोविंद गावडे यांच्यासोबत बोलणे झाले आहे. यावेळी कलाकार सूर्यकांत राणे, अयोध्या पांडु गांवकर, शाली गावकर, संतोष पिरणकर व माजी उपसंचालक अशोक परब यांचा सन्मान करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.