'मृतांमध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख'! लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर मांडली बाजू; महिन्याला 25 लाख हफ्ता देत असल्याची चर्चा

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंनी चौकशीवेळी सांगितले की, आमची देशभर २४ आऊटलेट्स आहेत. हजारो कर्मचारी तिथे काम करतात. बर्च क्लबस्थळी सुरक्षेसाठी खबरदारी घ्यायला हवी होती.
Luthra Brothers Arrested
Luthra BrothersDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: सौरभ आणि गौरव लुथरा यांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीवेळी पोलिसांसमोर हताश होऊन तसेच अश्रू गाळत त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत २५ लोक दगावल्याची आम्हाला खंत आहे. तसेच मृतांमध्ये आमच्या २० कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख अधिक आहे, असे ते म्हणाले.

लुथरा बंधूंनी चौकशीवेळी सांगितले की, आमची देशभर २४ आऊटलेट्स आहेत. हजारो कर्मचारी तिथे काम करतात. बर्च क्लबस्थळी सुरक्षेसाठी खबरदारी घ्यायला हवी होती; परंतु तसे झाले नाही. कुठेतरी दुर्लक्ष झाल्याचे लुथरा बंधूंचे मत होते.

लुथरा बंधूंनी परवाने न मिळवताच बर्च क्लब कार्यरत ठेवला. त्यामुळे हा अनधिकृत क्लब इतके महिने नक्की कोणाच्या आशीर्वादामुळे कार्यरत राहिला किंवा शासकीय कारवाईपासून कसा बचावला, हे गुपित लुथरा बंधू पोलिसांसमोर उघड करणार का, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. गोवा पोलिस लुथरा बंधूंच्या तोंडून, सत्य वदवून घेणार का किंवा सरकारी बाबू अथवा लोकप्रतिनिधींची नावे समोर येणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Luthra Brothers Arrested
Goa Nightclub Fire: थंडीत लुथरा बंधूंनी फरशीवर तळमळत काढली रात्र, बर्च बाय रोमियो लेन क्लबच्या मालकांनी कोठडीत केला देवाचा धावा

दरमहा लाखोंचा हफ्ता

काहींच्या मते, क्लबतर्फे महिन्याला २५ लाख रुपये हफ्ता दिला जायचा. परंतु, पोलिस किंवा दंडाधिकाऱ्यांनी याचा तपास केला आहे का, हे तपास अहवालातूनच समजेल. खात्रीलायक सूत्रांच्या मते, बर्च दुर्घटनेत अनेकांचे हात बरबटलेत. कारण अनेकांनी क्लबकडून येनकेन प्रकारेण स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतला असल्याचे बोलले जात आहे.

Luthra Brothers Arrested
Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

अनेकांचे हात बरबटलेले...

सध्या दंडाधिकारी तसेच हणजूण पोलिस आपल्या परीने या प्रकरणाचा सखोल तपास करताहेत. अनेकांचे जबाब नोंदविणे सुरू आहे. यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. काहींनी तपासात सहकार्य केले, तर काहींनी सारवासारव केली. आता दुर्घटनाग्रस्त बर्च क्लबकडून हफ्ते दिले जात होते, असे आरोप होताहेत. विरोधकांनी हा विषय लावून धरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com