Arpora Nightclub Fire: 'बर्च' पीडितांना भरपाई देण्यास लुथरा बंधू तयार; प्रस्‍ताव देणार, वकिलांनी दिली माहिती

Birch by Romeo Lane Fire: मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक भरपाई देण्याचा प्रस्ताव क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि व्यवस्थापनातर्फे ॲमिकस क्युरींकडे सादर करण्यात येणार आहे.
Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub FireDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमधील भीषण अग्निकांडातील पीडित तसेच मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक भरपाई देण्याचा प्रस्ताव क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि व्यवस्थापनातर्फे ॲमिकस क्युरींकडे सादर करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीदरम्यान लुथरा बंधूंच्या वकिलांनी ही माहिती दिली.

न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने या निवेदनाची नोंद घेतली असून, पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.

Arpora Nightclub Fire
Goa Shack Policy: शॅक्‍स धोरणाला एका हंगामाची मुदतवाढ, नियमभंग केल्‍यास लाखोंचा दंड; सीसीटीव्ही बंधनकारक

६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ‘बर्च’ क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. मृतांमध्ये क्लबमधील २० कामगार व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आसाम, उत्तराखंडसह अन्य राज्यांतील हे स्थलांतरित युवक होते.

Arpora Nightclub Fire
Goa Weather Alert Update : गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

क्लबच्या तळमजल्यावरील स्वयंपाकघरात आग लागल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असल्याने धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच पर्यटकांचाही मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com