गोवा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे व काॅंग्रेस या राजकीय हाडवैरींमध्ये पुन्हा उफाळला वाद

The argument between Alemao and Sardin is very old
The argument between Alemao and Sardin is very old

मडगाव : युतीच्या विषयावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार व काॅंग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन या राजकीय हाडवैरींमध्ये पुन्हा वाद उफाळला आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले आहेत. 
आलेमाव व सार्दिन यांच्यातील वाद बराच जुना आहे. सार्दीन व आलेमाव यांच्यात आधीपासूनच विस्तव जात नाही. एकमेकांप्रती या दोघांना पूर्वीपासून खुन्नस आहे.  सार्दिन मंत्री असताना आपल्याविषयी  अवमानकारक भाष्य केल्याचा उल्लेख आलेमाव करत असतात. सार्दिन यांना कुडतरीत दोनवेळा पराभूत करण्यात मुख्य भूमिका बजावून आलेमाव यांनी वचपा काढला आहे. 


  कुडतरीत बरीच वर्षे वर्चस्व राखलेले सार्दिन यांना १९९४च्या निवडणुकीत आतोन गावकर यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. आलेमाव तेव्हा युगोडेपात होते. पुढे २००७ च्या निवडणुकीतही सार्दिन यांना त्यांनी शह दिला होता. याखेपेस सेव्ह गोवा पक्षाची स्थापना करून रेजिनाल्ड लाॅरेन्स यांना त्यांनी उमेदवारी दिली होती. २००७नंतर सार्दिन दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले असले तरी स्थानिक राजकारणातून त्यांना बाहेर ठेवण्यात आलेमाव यशस्वी झाले आहेत. 


सार्दिन व आलेमाव यांच्यातील राजकीय वैरत्वास आणखीही पदर आहेत. २००७ च्या (लोकसभा)  दक्षिण गोवा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत व नंतर २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सार्दीन यांना उमेदवारी मिळू नये यासाठी आलेमाव यांनी प्रयत्न केले होते. आलेमाव यांचे आपली कन्या वालंका यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह होता.  २०१४मध्ये ही आलेमाव यांनी वालंका यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. पण, त्यावेळी वालंका यांचा पुन्हा अपेक्षाभंग झाला. या निवडणुकीत सार्दीन यांना डावलून रेजिनाल्ड लाॅरेन्स यांना उमेदवारी देण्यात आली होती. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com