समुद्रकिनाऱ्यावर हलवली खुर्ची, परप्रांतीय वेटरने केला खून; 'अमर'चे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत, आर्थिक अवस्थाही नाजूक

Arambol Murder Case: हरमल किनाऱ्यावर अस्ताव्यस्त स्थितीत समुद्राच्या पाण्यातही टेबल, खुर्च्या, बेड्स मांडले होते. यामुळे पादचाऱ्यांना अडथळा झाल्याने किंचित खुर्ची हलविली होती.
Arambol Murder Case
Arambol Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: येथील समुद्रकिनाऱ्यावर अमर बांदेकर या युवकाचा वेटरकडून झालेल्या खुनाला १५ रोजी वर्षे पूर्ण होत आहेत. सदर बांदेकर कुटुंबीय हलाखीच्या परिस्थितीत दिवस ढकलत असून मासळीवर गुजराण करणाऱ्या कुटुंबाला व बेरोजगार भावाला सरकारी नोकरीची संधी मायबाप सरकारने द्यावी, असे आर्त साकडे कुटुंबीय व नागरिकांनी सरकारला घातले आहे.

हरमल किनाऱ्यावर अस्ताव्यस्त स्थितीत समुद्राच्या पाण्यातही टेबल, खुर्च्या, बेड्स मांडले होते. यामुळे पादचाऱ्यांना अडथळा झाल्याने किंचित खुर्ची हलविली होती, त्या रागातून अमर बांदेकर याचा खून झाला होता.अद्यापही स्थानिकांच्या जखमा ताज्या असून, बांदेकर कुटुंबीय न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत असल्याचे दिसून येते.

ती घटना अशी; अमर किनाऱ्यावर रपेट घेण्यासाठी नियमितपणे जायचा. मात्र, दिवशीच्या संध्याकाळी त्याने वाटेत असलेली खुर्ची थोडिशी बाजूला केल्याचे निमित्त साधून परप्रांतीय वेटरने त्याचा खून केला होता.

त्या खुन्याला लागलीच अटक करून पोलिसांनी वाहवा मिळवली होती. मात्र, सध्या बांदेकर कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत असले तरी कमावता कर्ता मुलगा अमरचा बळी गेला.

त्यावेळी सरकारकडून आमदार जीत आरोलकर व माजी आमदार दयानंद सोपटे यांनी मासळी विकून चरितार्थ चालवणाऱ्या अभागी आईच्या हवाली आर्थिक मदत दिली. मात्र, ती मदत पुरेशी नव्हती. न्याय प्रलंबित असल्याने दुःखाश्रूंपलीकडे काहीच हाती नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

दरम्यान, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचे कार्य लोकाभिमुख असून मांद्रेत अनेक बाबतीत चैतन्यदायी वातावरण निर्माण केले आहे. अलिकडे वरक कुटुंबासाठी केलेला खर्च म्हणजे माणुसकीचा ओलावा टिकून असल्याचे चित्र आहे. हरमल येथील बांदेकर कुटुंबास, आमदार जीत आरोलकर यांनी मदत करावी,अशी मागणी होत आहे.

Arambol Murder Case
Arambol Murder Case: गोव्यात शॅकवर आणखी एक खून, महिन्याभरात दुसरी घटना; खुर्च्या हटवल्या म्हणून स्थानिकाचा घेतला बळी

अजूनही किनाऱ्यावर खुर्च्या, खाटा

पर्यटन खात्याच्या कुचकामी धोरणामुळे अनेक प्रसंग,घटना किनारी भागात घडत असतात. मात्र, खात्याचे काम नेमके कसे असते,हा प्रश्न आहे.पाण्यापर्यंत टेबल्स मांडून पादचाऱ्यांना अडथळे निर्माण केल्याने एका युवकांचा खून झाला, मात्र त्यानंतर अद्यापही तशीच स्थिती आहे. इतकेच नव्हे, दृष्टी जीवरक्षक व त्यांच्या वाहनांची अडचण शॅक्स व्यावसायिकांना होत असल्याचे खात्रीशीर समजते.

Arambol Murder Case
Calangute Murder Case: 'लव्ह ट्रँगल'मधून कळंगुटमध्ये भावनाची हत्या; नातेवाईक मुलीने प्रियकाराच्या सोबतीने काढला काटा

भावाला सरकारी नोकरी द्या!

किनारी भाग असल्याने परंपरागत मासळी विक्री करून कुटुंबाचा चरितार्थ चालत आहे.स्व अमरच्या आई,बाजारात मासळी विकून जी काय कमाई करेल,त्या उत्पन्नावर घर संसार अवलंबून आहे.

सध्या अमरचा भाऊ व बहीण बेरोजगार तसेच अविवाहित असून त्यांना सरकारी नोकरीची गरज आहे, किमान भाजप सरकारने बांदेकर कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी होत आहे.बांदेकर कुटुंबाला सावरण्याची गरज असून, सरकारने ‘अनुकंपा’ तत्त्वावर त्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com