गोवा: कोविड-19 व्यवस्थापनावर राज्य सरकारला सल्ला देणाऱ्या तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे की, 100 % उपस्थीतीमध्ये शाळांना नियमित ऑफलाईन वर्ग आयोजित करण्याची परवानगी द्यावी, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) सकारात्मकता दर सातत्याने 2% पेक्षा कमी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Approval given by expert committee for 100% capacity schools in goa)
सोमवारी बैठक झालेल्या समितीने देखील व्यवसायांना सामान्य कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यासाठी अशाच शिफारसी केल्या आहेत परंतु सावधगिरी बाळगली असुन, ज्यांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे त्यांनाच परवानगी देण्यात येईल.
चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, जलतरण तलाव, कार्यक्रमांसाठी इनडोअर ठिकाणे, स्पा आणि अशा इतर व्यावसायिक उपक्रमांना सामान्यपणे काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे समितीने राज्य सरकारला केलेल्या शिफारशींमध्ये म्हटले आहे.
तथापि, पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांपर्यंत मर्यादित असावेत आणि अन्यथा लोक आरटी-पीसीआर (RTPCR) नकारात्मक अहवाल अवश्यक असल्याचे यामध्ये नमुद आहे. तसेच मास्कचा वापर अनिवार्य राहावा, असे त्यात म्हटले आहे.
तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनंतर, आता राज्य सरकारकडून ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने महसूल सचिवांकडून नवीन मानक कार्यप्रणाली (SOPs) असलेले औपचारिक आदेश येत्या काही दिवसांत जारी करण्यात येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.