Fatorda News : फातोर्ड्यात तीन उड्डाण पुलांसाठी मंजुरी : विजय सरदेसाई

Fatorda News : घोगळ येथील जंक्शनवरील वाहतूक सिग्नल्सची पाहणी
Fatorda
FatordaDainik Gomantak

Fatorda News :

सासष्टी, फातोर्डात तीन उड्डाण पुलांसाठी मंजुरी दिली असून केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी ७.५ कोटी रुपयांची निविदा जारी केल्याची माहिती फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज पत्रकारांना दिली.

सरदेसाई यांनी सांगितले की, वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण माजी केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पश्र्चिम बगल रस्त्या संदर्भात चर्चा करण्यास गेलो होतो, तेव्हा या तीन उड्डाण पुलांची मागणी केली होती.

हे उड्डाण पूल नुवे जंक्शन, आर्लेम जंक्शन तसेच बोलशे सर्कल-फ्लोरियानो वाझ जंक्शन ते पावर हाऊसपर्यंत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला होणारा अडथळा दूर होईल. ज्या कोणाला वास्को, पणजीहून नावेली, कुंकळ्ळी, काणकोण- कारवार जायचे असेल त्यांना या उड्डाणपुलावरून जाता येईल, असेही सरदेसाई म्हणाले. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात जर नितीन गडकरींकडे परत हे खाते देण्यात आले तर या संदर्भात पाठपुरावा करणे सोपे जाईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

आपण या उड्डाण पुलाचा विषय विधानसभेतही उपस्थित करणार आहे. मी सरकारकडून परत त्यासाठी वचनबद्धता घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार सरदेसाई यांनी घोगळ येथील फ्लोरियानो वाझ जंक्शनवर एका महिन्यापूर्वी कार्यान्वित केलेल्या वाहतूक सिग्नलची पाहणी केली. ही सिग्नल सुरु केल्यानंतर स्थानिकांच्या काही समस्या होत्या त्या आपण ऐकून घेतल्या. सिग्नलसाठी जो वेळ घालून दिला होता, त्यामुळे वाहतूक खोळंबत होती.

Fatorda
Goa Congress:...तर दोन दिवसांत गोव्यात काँग्रेसचे सरकार; विरोधीपक्षनेते आलेमाव यांनी सांगितले गणित

पादचाऱ्यांना सुद्धा त्रास होत होता. आता आपण सिग्नल घड्याळकाटे विरुद्ध करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विरुद्ध दिशेसाठी ४०-४० सेकंद व हाउसिंग बोर्ड व विद्यानगर बाजूंच्या रस्त्यावर २०-२० सेकंद एवढा वेळ निश्र्चित करण्यास सांगितल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.

पादचाऱ्यांसाठी सुद्धा सूचना फलक लावण्याचा आदेश आपण दिला आहे. येथील सर्कलाचा आकार कमी करण्यात येईल, तसेच स्वामी विवेकानंद रस्ता नामफलक जंक्शनपासून दूर उभारण्यात येईल. भूमीगत ट्रान्सफॉर्मरही हलविला जाईल, असे सरदेसाई सांगितले.

Fatorda
Goa Loksabha Election Result: अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये नाईकांच्या साथीला; डिचोलीत भाजपची ‘किमया’

फुटसाल मैदान कामाचा आढावा

दरम्यान आमदार सरदेसाई यांनी बोर्डा येथील फुटसाल मैदानाच्या कामाचा आढावा घेतला. हे मैदान एक ते दोन महिन्यात पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. शिवाय या फुटसाल मैदानाबरोबरच फातोर्डात माडेल येथील पार्किंग जागा व रवींद्र भवन जवळील श्री दामोदर जंक्शनचे सौंदर्यीकरण मिळून तीन योजना सुरु असून त्या पूर्णत्वाकडे आहेत, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com