Ration Card: शिधापत्रिका पूर्ववत करण्यासाठी बार्देशातून 798 जणांकडून अर्ज

एकूण 15,707 शिधापत्रिका निलंबित
Ration Card
Ration CardDainik Gomantak

Ration Card सलग सहा महिने रेशन कोटा घेण्यास अपयशी ठरलेल्या लाभार्थींच्या शिधापत्रिका नागरी पुरवठा खात्याने एक फेब्रुवारीपासून निलंबित केल्या होत्या. बार्देशात 15,707 हजार शिधापत्रिका निलंबित करण्यात आल्या होत्या. यातील आतापर्यंत फक्त 798 लाभार्थींनी आपली शिधापत्रिका पूर्ववत करण्यासाठी विभागाकडे अर्ज केलेत.

बार्देशमधून नागरी पुरवठा कार्यालयाकडे 798 जणांनी रेशन कार्ड पूवर्वत करण्यासाठी अर्ज केलेत असून, यातील 500 रेशन कार्ड विभागाने पूर्ववत केली. तर उर्वरित प्रक्रिया सुरु आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून सरासरी विभागाकडे 100 अर्ज रेशन कार्ड पुनरुज्जीवित करण्यासाठी येताहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Ration Card
Women's Day 2023 : महिला दिनी नावेलीत 'विविधा'तर्फे माजी विद्यार्थिनींचा सत्कार

बार्देशात सुमारे 15,707 शिधापत्रिका रेशन कोटा न उचलल्याने नागरी पुरवठा खात्याने निलंबित केल्या होत्या. जे ग्राहक रेशन दुकानांतून मासिक कोटा उचलत नाहीत, त्यांची रेशनकार्डे निलंबित केली जातील, असे विभागाने जाहीर केले होते.

Ration Card
Science Day: सिंबॉयसीस शाळेच्या विज्ञानदिन स्पर्धेत विद्या वृद्धी प्रथम

राज्यात सार्वजनिक वितरण प्रणाली लाभार्थ्यांच्या तीन श्रेणी आहेत. बार्देश तालुक्यात 50 हजार शिधापत्रिकाधारक लाभार्थी असून, नागरी पुरवठा विभागाने एजन्सीद्वारे मासिक कोटा उचलण्यात अपयशी ठरलेल्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका शॉर्टलिस्ट करीत निलंबित केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com