Goa Drugs Case: अमली पदार्थ विरोधी पथकाचा आज पुन्हा शिवोलीत छापा, 8.5 लाखांचे अमली पदार्थ जप्त

मूळ नायजेरियन नागरिक असलेला अब्दुल रौफ अब्दुल्लाही याला ताब्यात घेतला आहे
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Drugs Case सध्या गोव्यात अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणात वाढ होत असून कळंगुट, हणजूण, शिवोली सारख्या किनारपट्टीच्या भागातून पोलिसांकडून छापेमारी सुरु आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी म्हापसा पोलिसांकडून शिवोली येथे छापा टाकण्यात आला होता.

यावेळी सूरज तोडी नामक बंगळुरू येथील व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. तर कळंगुट येथे छापेमारीवेळी एका पश्चिम बंगालच्या मजूराकडून 2 लाखाचा अमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागला होता.

आज पुन्हा शिवोली येथे अँटी नार्कोटिक्स सेलकडून छापा मारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Goa Drug Case
CM Pramod Sawant: कर्नाटकात प्रमोद सावंत यांचा हटके प्रचार चर्चेत

अँटी नार्कोटिक्स सेलला मिळालेल्या माहितीच्या आधारे अँटी नार्कोटिक्स सेलने आज शिवोली येथे छापा टाकला असून यावेळी मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतलं आहे.

मूळ नायजेरियन नागरिक असलेला अब्दुल रौफ अब्दुल्लाही (सध्या राहणारा चापोरा) याला 60 ग्रॅम एक्स्टेसी ड्रग्जसह ताब्यात घेतला आहे.

जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 8.5 लाख एवढी असून बेकायदेशीर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अब्दुल्लाही याला अटक करण्यात आली आहे. या संबंधी पुढील तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Curchorem Drug Capital Goa
Liberian Drug Accused Goa
Morjim Drugs Bust
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com