ANC Arrest Italian DJ And His Accomplice In Drugs Case: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करीत एका इटालियन डीजे ऑपरेटरला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून 55 लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईबात राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) जसपाल सिंग यांनी गोवा अमली पदार्थ विरोधी पथकाचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा सर्व घटकांना हा एक इशारा असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रविवारी पहाटे आसगाव येथे छापा टाकून इटालियन डीजे मायकल लॉरेन्स स्टेफेनोनी उर्फ डीजे बबलहेड (32) व त्याच्या साथीदार नेल वॉल्टर (28) या संशयितांना अटक केली.
हा इटालियन डीजे ऑपरेटर गोव्यात दोन पार्ट्यांमध्ये सादरीकरण करणार होता. मात्र त्याआधिच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
संशयिताकडून तब्बल 55 लाख रुपये किमतीचे 50 ग्रॅम आयएसडी आणि 50 ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेच. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलमअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.