भारतीय तत्त्वज्ञानात दैनंदिन प्रश्‍नांची उत्तरे - अभिजीत पवार

‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी रवींद्र भवन येथे सीआयएसएफ जवानांना केले मार्गदर्शन
Abhijit Pawar
Abhijit PawarDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: भारतीय सैन्य दलातील जवानांच्या, सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांच्या मनात आणि रक्तातच राष्ट्रभक्ती आहे. ते त्यांचे कर्तव्य कायम निष्ठापूर्वक आणि समर्पित भावनेने करतात. परंतु अनेकदा असे जवान आपल्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्याबद्दल अनभिज्ञ असतात. दैनंदिन कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाच्या वेळा यामुळे अनेकदा असंख्य प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागते. (Answers to daily questions lie in Indian philosophy - Abhijit Pawar )

Abhijit Pawar
गोव्यात पावसाळी अधिवेशनाचे अखेर सूप वाजले

अशा दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि गीतेत आहेत. त्याचा अभ्यास करून आयुष्याकडे सकारात्मकतेने बघणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’ चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी केले.

Abhijit Pawar
Smriti Irani वादात; गोव्यातील बेकायदेशीर बारप्रकरणी काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

‘गोमन्तक’ आणि ‘सीआयएसएफ’च्या वतीने वास्को येथील रवींद्र भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन पर कार्यक्रमात ते बोलत होते.‘सीआयएसएफ’चे वरिष्ठ कमांडर प्रताप पुंडे, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक, उप कमांडर कुंवर बहादूर आदी मान्यवर आणि ‘सीआयएसएफ’चे जवान यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, आर्थिक स्थैर्य येत असतानाच त्यात भौतिक आणि अध्यात्मिक समन्वय राखणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून वैयक्तीक व सामाजिक पातळीवर काम होणे आवश्यक आहे. आपला विचार करत असतानाच निसर्ग संतुलनाकडे लक्ष दिले पाहिजे. सकाळ माध्यम समूह आणि ‘गोमन्तक’तर्फे नेहमीच अशा विषयांसाठी पुढाकार घेण्यात येतो.

दरम्यान, भारतीय सैन्य, पोलिस, सीआयएसएफ अशा दलातील सुरक्षा रक्षकांच्या कार्याबद्दल पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली. भाषणानंतर जवानांच्या प्रश्नांना पवार यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. सीआयएसएफचे कमांडर प्रताप पुंडे यांनी सकाळ माध्यम समूहाचे आभार व्यक्त केले.

आर्थिक,औद्योगिक सल्लागारांचे व्यासपीठ

कष्टाने मिळवलेला पैसा कसा टिकवावा,याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. त्यासाठी त्यांना संबंधित तज्ज्ञांकडून मार्गदर्शन लाभण्याची गरज आहे. त्यासाठी पुढील काळात अशा विषयांसाठी उद्योजक, आर्थिक सल्लागार, मार्गदर्शक अशांचे एक व्यासपीठ बनवण्यात येणार असून त्याद्वारे मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाईल, असे सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com