Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Police: कोलवा येथील विल्‍मा नामक महिलेने ‘गोमन्‍तक’ टीव्‍हीशी बोलताना, या उपनिरीक्षकाने मलाही असेच सतावले होते, असे सांगितले.
सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार
Colva police StationDainik Gomantak

उतोर्डा येथील एल्‍मीरा फुर्तादो या महिलेला मारहाण केल्‍याचा आरोप असलेला काेलवाचा उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे.

कोलवा येथील विल्‍मा नामक महिलेने या उपनिरीक्षकाने आपल्‍याला विकास शर्मा या कॉन्‍स्‍टेबलसह अशाच प्रकारे सतावल्‍याची तक्रार केली आहे.

यासंदर्भात तिने यापूर्वीच दक्षिण गाेव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्‍याकडे तक्रार केली आहे. तथापि, या उपनिरीक्षकाच्‍या विरोधात खात्‍यांतर्गत चाैकशी सुरू असून त्‍याला कोलवा पोलिस स्‍थानकावरून हटवून दक्षिण गोवा पोलिस उपमुख्‍यालयात उपअधीक्षकांच्‍या कार्यालयात हजेरी देण्‍यास सांगितले आहे. उपनिरीक्षक शिरोडकर याच्या चौकशीसाठी उपअधीक्षक संतोष देसाई यांना नेमले आहे. ही चौकशी सुरू झाली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सावंत यांनी दिली.

कोलवा येथील विल्‍मा नामक महिलेने ‘गोमन्‍तक’ टीव्‍हीशी बोलताना, या उपनिरीक्षकाने मलाही असेच सतावले होते, असे सांगितले. मे महिन्‍यात हा प्रकार घडला. एका घरगुती भांडणात या महिलेच्‍या विरोधात एकाने कोलवा पाेलिसांत तक्रार दिल्‍यानंतर विकास शर्मा नावाचा पोलिस शिपाई तीन महिला पोलिसांना घेऊन माझ्या घरी आला.

यासंबंधीची माहिती मी मोबाईल फोनवरून देत असताना विकासने तो खेचून घेतला. त्‍यानंतर तुला फोन हवा असेल तर पोलिस स्‍टेशनवर येऊन घेेऊन जा, असे मला सांगितले. त्‍या मोबाईल फाेनच्‍या कव्‍हरमध्‍ये मी शंभर डॉलर घालून ठेवले होेते.

शिवाय एटीएम कार्ड आणि अन्‍य दोन कार्डही होती, असे तिने सांगितले. यासंदर्भात मी दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक तसेच मडगावचे उपअधीक्षक यांच्‍याकडे तक्रार केली. मात्र, या तक्रारीची कुणीही दखल घेतली नाही असा आरोप या महिलेने केला आहे.

सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार
Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

मोबाईलमधील माहिती काढून टाकली

मी माेबाईल आणण्‍यासाठी पोलिस स्‍थानकावर गेले असता मोबाईल उपनिरीक्षक शिरोडकर यांच्‍याकडे असल्‍याचे सांगण्‍यात आले. मी ताे मागितला असता, आम्‍ही जे लिहून देऊ, त्‍यावर सही केल्‍यासच तुम्‍हाला मोबाईल देऊ, असे शिरोडकर यांनी सांगितले.

मी ते करण्‍यास नकार दिल्‍यावर त्‍याने मला धमकी दिली. त्‍यानंतर कोर्टात जाऊन मला मोबाईल परत मिळवावा लागला. तोपर्यंत पाेलिसांनी माझ्‍या मोबाईलमधील सर्व डाटा फॉरमॅट करून माहिती काढून टाकली.

एवढेच नव्‍हे, तर या मोबाईलच्‍या कव्‍हरमध्‍ये असलेले शंभर डॉलरही मला परत दिले नाहीत, असे त्या महिलेने सांगितले.

उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर याच्‍याविराेधात विल्‍मा नामक महिलेने केलेली तक्रार माझ्‍यापर्यंत आलेली नाही. तरीही या गोष्‍टीत तथ्‍य आहे की नाही, याचा आम्‍ही जरूर तपास करू. सध्‍या त्‍या उपनिरीक्षकाची चौकशी सुरू झाली आहे. या नव्‍या आराेपात तथ्‍य सापडल्‍यास त्‍याचीही चौकशी करू, असे पाेलिस अधीक्षक सुनीता सावंत म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com