Goa Government: भोम बगलमार्ग नाकारणाऱ्या सरकारविरोधात पुन्हा आंदोलन

Goa Government: भोमा गावातून राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात ग्रामस्थांचा पूर्वीपासून विरोध आहे. त्यासाठी स्थानिक लोक सरकारकडे बगलमार्गाची मागणी करीत आहेत.
Bhoma Villagers Protest Against Expansion of Highway file photo
Bhoma Villagers Protest Against Expansion of Highway file photo Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: भोमा गावातून राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात ग्रामस्थांचा पूर्वीपासून विरोध आहे. त्यासाठी स्थानिक लोक सरकारकडे बगलमार्गाची मागणी करीत आहेत. गेल्या एक वर्षापासून स्थानिक लोक सरकारविरुद्ध लढा देत आहेत. परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने ग्रामस्थांनी सध्या आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

Bhoma Villagers Protest Against Expansion of Highway file photo
Forest Department: तांबडी-सुर्ला वन खात्याच्या गेटवर ‘सीसीटीव्ही’ची गरज

यापूर्वी ग्रामस्थांनी अनेक बैठका घेऊन विविध संस्थेचा पाठिंबा घेतलेला आहे. यापूर्वी आरजीचे आमदार, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई अन्य नेत्यांनी या ठिकाणी येऊन लोकांना पाठिंबा दर्शविला आहे. आता अन्य नेतेही रविवार, 15 रोजी होणाऱ्या सभेत उपस्थित राहणार असल्याने आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता.८) सकाळी ज्येष्ठ नागरिक पोपट जल्मी, वामन नाईक, ओमदास नाईक व संजय नाईक यांनी यावेळी राखणदाराकडे गाऱ्हाणे घालून सरकारला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना केली.

भोम येथील ग्रामस्थ संजय नाईक यांनी अधिक माहिती देताना केंद्र सरकारची लॉबी करणारे राज्य सरकार जनतेच्या विरोधात जाऊन प्रकल्प राबविण्यात अधिक महत्त्व देत आहे. भोमवासीयांचा जागृत देवस्थानावर विश्वास असून बगल रस्त्यासाठी पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र करून यश मिळविण्यासाठी रविवारी गाऱ्हाणे घालण्यात आले. बगलरस्त्यासाठी ग्रामस्थांनी माघार घेणार नसून १५ रोजी तीव्र आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com