Dabolim Accident: पुन्हा दाबोळी येथे अपघात, KTM चालक धडकला ऑडी कारला

भरधाव KTM चालकाने ऑडी कारला धडक दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
Dabolim Accident
Dabolim AccidentDainik Gomantak

Dabolim Accident: गोव्यातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. दाबोळी येथील मुख्य सिग्नलसमोर एका सिमेंट कॉंक्रिटवाहू ट्रकने सायकलस्वाराला धडक दिल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर चार दिवसांनी पुन्हा दाबोळी येथे अपघाताची घटना समोर आली आहे.

भरधाव KTM चालकाने ऑडी कारला धडक दिल्याचे समोर आले आहे. आज (दि.12) दुपारी हा अपघात झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव येणारी KTM बाईक( GA-06-AC-4397) आणि भरधाव जाणारी ऑडी कार (Audi Q3 GA-07-E-6745) यांच्यात धडक झाली. KTM बाईक कारच्या पुढच्या टायरजवळील भागाला धडक दिली. या धडकेत KTM चालक खाली पडला व त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

KTM बाईक चालकाच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय. उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमी चालकाचे नाव समजू शकले नाही.

Dabolim Accident
Goa Accident News : ट्रकच्या धडकेने दाबोळीत सायकलस्वार ठार; पणजीत हिट ॲण्ड रन

शनिवारी झालेल्या अपघातात एक ठार

दरम्यान, शनिवारी (दि.08) दाबोळी येथील मुख्य सिग्नलसमोर एका सिमेंट कॉंक्रिटवाहू ट्रकने सायकलस्वाराला धडक दिल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला.

बायणा येथे सिमेंट कॉंक्रिट घालून पुन्हा कुठ्ठाळी - साकवाळकडे जात असताना या ट्रकने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. त्यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com