Shigmotsav 2024: पणजीत आज वार्षिक शिमगोत्सव

Shigmotsav 2024: वाहतूक व्यवस्थेत बदल: चित्ररथ मिरवणूक सांता मोनिका जेटीपासून
Goa Shigmotsav 2024
Goa Shigmotsav 2024Dainik Gomantak

Shigmotsav 2024:

राजधानी पणजीतील वार्षिक शिमगोत्सवानिमित्त येत्या 30 रोजी भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर शिमगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी चित्ररथ मिरवणूक सांता मोनिका जेटीपासून सुरू होणार आहे. रायबंदर कॉजवेवर हे चित्ररथ एकत्र येतील आणि सुमारे 3 वाजता मिरवणुकीस प्रारंभ होईल. त्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

पणजी शिमगोत्सव समिती, वाहतूक विभाग, महानगरपालिका व इतर सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. त्यात शिमगोत्सवाच्या निमित्ताने वाहतूक व्यवस्था कशी असावी, ती कशी सुरळीत होईल, यासाठी खालीलप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरात येणाऱ्या वाहनांसाठी

1) पणजी शहरात येणारी वाहतूक नवीन पाटो पुलामार्गे दिवजा सर्कलमार्गे आणि बहुउद्देशीय पार्किंग इमारत मार्गाने पुढे जाईल आणि चर्च चौक/क्रॉस रोड जंक्शनमार्गे पुढे दयानंद बांदोडकर पुतळ्याजवळून शहरात वळवली जाईल.

2) बांबोळी बाजूने येणाऱ्या वाहनांना नवीन मळा पूल-चार खांब जंक्शन-भाटलेमार्गे पणजी शहरात प्रवेश दिला जाईल.

3) चित्ररथ मिरवणूक सुरू झाल्यानंतर, बांदोडकर मार्गावर फ्लोट परेड संपेपर्यंत कोणत्याही सिटी बसेसला दोन्ही दिशेने धावण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Goa Shigmotsav 2024
Goa Politics: मुख्यमंत्र्यांना पत्नीसह अटक करा; आप’ची मागणी

शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी

1) मिरामार बाजूकडील मार्गावरील बसेससह बाहेर जाणारी वाहतूक कांपाल गणेश येथून उजवीकडे वळण घेऊन अग्निशमन दल कार्यालय-सांतईनेज जंक्शन-काकुलो आयलँड येथून १८ जूनमार्गे चर्च चौक आणि न्यायालयाच्या मागील रस्त्याने जुन्या पाटो पुलावरून पुढे वाहने जातील किंवा मळा पुलावरूनही जाता येईल.

2) रुअ-दे-ओरेम येथून हॉटेल सोनाजवळ पोहोचल्यावर येणाऱ्या रहदारीला डावीकडे जाऊ दिले जाणार नाही. ती वाहतूक उजवीकडे वळण घेऊन काजू दरबारकडे आणि त्यांच्या संबंधित मार्गाकडे वळवली जाईल.

चित्ररथांसाठी सूचना

  • दुपारी २ वाजल्यापासून सर्व चित्ररथांना दिवजा सर्कलवरून, सांता मोनिका जेट्टीजवळील मांडवी पुलाखालून सुरवातीच्या स्थानापर्यंत भाऊसाहेब बांदोडकरमार्गे जुन्या सचिवालयापर्यंत जाण्यास परवानगी असेल. नदीच्या बाजूच्या मार्गावरून.

  • चित्ररथ आरोग्य संचालनालयाजवळ (कांपाल) संपतील आणि त्यानंतर डीबीबीवरील फुटबॉल मैदानावर ते पार्क केले जातील.

  • केटीसी सर्कलकडून दिवजा सर्कलच्या दिशेने कोणतेही चित्ररथ येऊ दिले जाणार नाहीत. त्याऐवजी ते मेरशी-रायबंदर रस्त्यावरून रायबंदर कॉजवेकडे येण्यासाठी बगल मार्गाने मेरशी सर्कलकडे वळवले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com