दक्षिण गोव्यात येत्या रविवारी (दि.30 एप्रिल) आठ तास वीज पुरवठा वार्षिंक दुरूस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त बंद राहणार असल्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, वीज खात्याने हा निर्णय रद्द केला आहे.
यापूर्वी देखील शिगमोत्सवानिमित्त वीज खात्याने निर्णय मागे घेतला होता, त्यानंतर 30 एप्रिल रोजी निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती. दरम्यान, यावेळी देखील हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील 220 केव्ही सबस्टेशन, कुंक्कळी येथील 220 केव्ही आणि वेर्णा येथील 110 केव्ही सबस्टेशनची दुरूस्ती आणि देखभाल संबधित काम केले जाणार आहे. असे वीज खात्याने पत्रकात म्हटले होते. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार होता.
दरम्यान, वीज खात्याने तुर्तास हा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत पुढील निर्णयाची माहिती नंतर दिली जाईल असे खात्याने म्हटले आहे.
यापूर्वी 11 मार्च रोजी दक्षिण गोव्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित राहणार होता. दरम्यान, शिगमोत्सवामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला होता. त्यानंतर येत्या रविवारी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे खात्याने म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.