Goa Farming: राज्यात कृषी अभ्यासासाठी विद्यार्थ्याला दीड लाख रूपये देण्याची कृषीमंत्र्यांकडून घोषणा

जास्तीत जास्त युवकांनी कृषी क्षेत्रात येण्याची गरज; रवी नाईक
Ravi Naik
Ravi Naik Dainik Gomantak

गोवा: जास्तीत जास्त युवकांनी कृषी क्षेत्रात येण्याची गरज कृषीमंत्री रवी नाईक व्यक्त केली. तसेच सरकारी योजनांचा व प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी युवकांना केलं आहे. राज्यातील शेतजमिनींचे भू रुपांतर कमी होण्यासाठी हा प्रयत्न आहे असे त्यांनी या दरम्यान सांगीतले. कृषी अभ्यासासाठी एका युवकाला दीड लाख वैयक्तिक देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

(Announcement of giving one and half lakh personal to youth for agricultural studies in goa)

Ravi Naik
Goa Job Scam: पोलीस भरतीत मोठा घोटाळा; विजय सरदेसाई

कृषी क्षेत्रात सांगे तालुक्याची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल!

सांगे मतदारसंघ फळे, फुले आणि भाजी उत्पादनात नक्कीच स्वयंपूर्ण झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण येथे सर्व प्रकारची फळभाजी, पालेभाजी आणि इतर पिके उत्पादित होऊ लागली आहेत. फलोत्पादन महामंडळाकडून शेतकऱ्यांची भाजी विकत घेतली जाते. मात्र, कृषी उत्पादनाला योग्य दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

सांगेत टोमॅटो, कोबी, ढबू मिरची, काकडी, दुधी भोपळा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. वांगी, घोसाळी, कंदमुळे, सुरण, अळू, माडी अशा भाज्या विपुल प्रमाणात खेडोपाड्यात उत्पादित होऊ लागल्या आहेत. पालेभाज्या, हिरवी मिरची, मसाला यापासून स्ट्रॉबेरीपर्यंत पिकापर्यंत सांगे मतदारसंघ अग्रेसर आहे.

डोंगरावर फुलवले भाजीचे मळे

सांगेच्या जमिनीत कोणतेही पीक उगवते, हे कृषी खात्याने सिद्ध केले आहे. साळजिणी, तुडव, वेर्ले या डोंगराळ भागात कोणतेही पीक उगवते. प्रयोग म्हणून लावलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या फलोत्पादन महामंडळ खरेदी करून राज्यात विक्रीसाठी पाठवते. नेत्रावळीची काकडी दररोज टनांच्या हिशेबाने खरेदी केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दर मात्र कमीच आहेत. यात सरकारने लक्ष घालून थोडी वाढ करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Ravi Naik
Goa Job Scam: पोलीस भरतीत मोठा घोटाळा; विजय सरदेसाई

स्ट्रॉबेरीपासून मसाल्यांपर्यंत सर्व काही

सांगेच्या मातीत कोणतेही बी रुजायला घातले कि ते हमखास उगवते, हे स्ट्रॉबेरीसारख्या पिकाने सिद्ध केले आहे. साळजिणीसारख्या गावात बासमती तांदूळ होऊ शकतो, तर पाट-नेत्रावळीत काळा तांदूळ होतो. डोंगराळ भागात चांगल्या प्रतीचा टोमॅटो, कोबी, नवलकोल (गड्डे), ढबू मिरची होते. जायफळ, दालचिनी (तिखी), पत्री, मिरी, वेलची पासून व्हेनिलासारखे उत्पादन घेण्यात येते.

झेंडूच्या फुलांना मागणी

सांगेत मेरीगोल्डसारखी फुले मोठ्या प्रमाणात होतात. कृषी खात्याने सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध करून दिल्याने दसरा-दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन घेण्यात येते. ऑर्किडचे उत्पादनही घेण्यात येते. कोरोना महामारीपूर्वी सांगे भागात ऑर्किड फुलांचे मळे फुलविले होते. ती फुले राज्यात आणि राज्याबाहेरही बऱ्यापैकी जात होती. पण कोरोना काळात ग्राहक नसल्याने हा व्यवसाय मागे पडला. पर्यायाने ऑर्किडचे उत्पादन घटले.

दैनंदिन रोजगार: प्रत्येक हंगामात रोजगार निर्मिती करण्याइतकी पिके सांगेत उत्पादित होत आहेत. त्यामुळे स्थानिकांना खास करून महिला वर्गाला दैनंदिन रोजगार उपलब्ध होत आहे. पावसाळा सुरू होताच गावठी भाजीपाला, काकडी, दोडका, चिबूड विक्री सुरू होते. संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी गावठी गूळ निर्मिती सुरू केली आहे. त्याची विक्री खुल्या बाजारात केली जाते. दिवाळीनंतर कारंदे, कणगे, अळू, माडी, सुरण यांची विक्री केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com