महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या गट समितीची घोषणा

मांद्रे मतदारसंघातील मगोच्या (Maharashtrawadi Gomantak Party) कार्यकर्त्यानी स्वतःची ओळख स्वाभिमानी मगो कार्यकर्ता म्हणून केली पाहिजे.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षDainik Gomantak

मोरजी: मांद्रे मतदारसंघाची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (Maharashtrawadi Gomantak Party) गट समितीची घोषणा मगो केंद्रीय समितीचे सदस्य तथा मांद्रेचे माजी सरपंच व विद्यमान पंच राघोबा गावडे यांनी घोषित केली. मांद्रे मगो गट समितीच्या अध्यक्षपदी हरमलचे पंच सदस्य प्रविण वायंगणकर यांची अविरोध निवड करण्यात आली.

दरम्यान,मोरजी व तुये भागांत घरोघरी प्रचारात अनेक समस्या अनुभवण्यास मिळाल्या. गट समितीने (committee) ह्या मोहिमेत सक्रीयतेने भाग घेऊन समस्या सोडविण्यास सहकार्य करावे.मांद्रेतुन यंदा मगोचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उमेदवार जित आरोलकर यांनी केले.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
मोरजी किनारी भागात पार्किंगची गैरसोय

मांद्रे मतदारसंघातील मगोच्या कार्यकर्त्यानी स्वतःची ओळख स्वाभिमानी मगो कार्यकर्ता म्हणून केली पाहिजे.पक्षाचे कार्य तेव्हाच वाढेल जेव्हा कार्यकर्ता ताठ बाण्याने पक्षाच्या ध्येयधोरणाचा प्रसार तळागाळात करतील.आगामी काळातील उलथापालथीना डगमगून न जाता,जित आरोलकर यांना निवडून आणूया असे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राघोबा गावडे यांनी केले.

मांद्रे मतदारसंघात मगो पक्षाचे कार्य करताना उमेदवार जित आरोलकर यामांद्रे मतदारसंघात (Constituency) मगो पक्षाचे कार्य करताना उमेदवार जित आरोलकर याना निवडून आणण्याचे ध्येय गाठण्यासाठी सर्व ते प्रयत्न चालू आहे. पक्षाच्या जेष्टय नेत्यांचे व समितीतील सदस्यांची मते बरोबर घेऊन कार्य विस्तारले जाईल. मगो केंद्रीय समिती (Central Committee) व उमेदवार जित आरोलकर यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण निश्चितपणे काम करणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रविण वायंगणकर यांनीव्यक्त केले.मांद्रे मतदारसंघात 20 वर्षानंतर पुन्हा एकदा सिंहाचा छावा अर्थात जित आरोलकर निवडून येईल ह्यात तिळमात्र शंका नाही.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
मोरजी, हरमल किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

आपल्या बरोबरीने प्रत्येक कार्यकर्ता, मतदार आदींनी निर्धार केला असल्याचे उपाध्यक्ष उदय मांद्रेकर यांनी व्यक्त केले. जनरल सेक्रेटरी आंबरोज फेर्नांडिस यांनी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा केली.ख्रिश्चन बांधवांनी नेहमीच मगोच्या वाटचालीत योगदान दिले आहे व आगामी काळात जनतेच्या (public) भल्यासाठी वावर करणाऱ्या युवा दमाच्या जित आरोलकर याना मांद्रेतील जनतेने निवडून देण्याचे आवाहन मांद्रेचे पंच सदस्य तथा जनरल सेक्रेटरी आंबरोज फेर्नांडिस यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रनिवेदन दयानंद मांद्रेकर तर देवेंन्द्र प्रभुदेसाई यांनी आभार मानले.

मांद्रे गट कार्यकारिणी:

उपाध्यक्ष अनंत (राजन) शेटगांवकर,प्रदीप हडफडकर(पंच मांद्रे) उदय मांद्रेकर,जनरल सेक्रेटरी आंबरोज फेर्नांडिस, (पंच मांद्रे),उपसचिव महादेव हरमलकर (पंच मांद्रे), गुणाजी ठाकूर,(पंच हरमल), सदस्य तातोबा तळकर( माजी उपसरपंच केरी),शरद मांद्रेकर(मांद्रे),जितेंद्र शेटगांवकर(माजी उपसरपंच,मोरजी), उल्हास नाईक,(तुये माजी सरपंच),डॉमनिक अल्फान्सो (हरमल)योगेश मांद्रेकर (मांद्रे)सागर पोके (मोरजी)डॉ जोसेफ फेर्नांडिस (मांद्रे)लाडजी नाईक (पालये)यांची निवड करण्यात आली.यावेळी मांद्रे उमेदवार जित आरोलकर, जेष्टय कार्यकर्ते नारायण सोपटे केरकर, देवेंद्र प्रभुदेसाई उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com