गोवा समर्पण आश्रमात वर्धापन दिन सोहळा; केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती

मंत्री श्रीपाद नाईक यांनी समर्पण ध्यान साधनेबद्दल आपले मत व्यक्त केले.
Samarpan Ashram Goa
Samarpan Ashram GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Samarpan Ashram Goa: 13 मे 2023 ला शिरोडा येथील समर्पण आश्रमात 11 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी केंद्रीय श्रीपाद नाईक तसेच योगप्रभा भारतीच्या मॅनेजिंग ट्रस्टी शिना ओमप्रकाश वित्तप्रमुख प्रताप शहा, सी. के. ओमप्रकाश, गोविंद पर्वतकर, राजेंद्र गावणेकर, नवदास नाईक इ. मान्यवरांची उपस्थिती होती.

Samarpan Ashram Goa
Water Conservation Project: केळावडेत उभारणार तीन जलसंवर्धन प्रकल्‍प

मंत्री श्रीपाद नाईक यांनी समर्पण ध्यान साधनेबद्दल आपले मत व्यक्त केले. यावेळी सर्व प्रथम मोदक हवनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये 583 साधक-साधकांनी भाग घेतला. मंत्रोच्चाराच्या जयघोषांनी सारा आश्रम चैतन्यमय झाला होता. हा विधी पार पाडण्याची धुरा सुप्रिया दीदी, स्नेहलता दीदी आणि समृद्धी दीदी यांनी सांभाळली. त्यानंतर नामस्मरणाच्या कार्यक्रमात स्वामींचे ध्यान, प्रवचन आणि भजन करण्यात आले. वर्धापन कार्यक्रमात भक्तगणांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

वर्धापन कार्यक्रमाला WRD मंत्री आणि आमदार सुभाष शिरोडकर यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पूर्ण कार्यक्रमाची पाहणी करून चैतन्य विज्ञान प्रदर्शनाची माहिती त्यांनी जाणून घेतली. दरम्यान, समर्पण आश्रम व्यवस्थापक नीलेश कवळेकर यांनी साधकांना संबोधित केले.

Samarpan Ashram Goa
Samarpan Ashram GoaDainik Gomantak

संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात 25 गटांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध नृत्यांचे आविष्कार पाहायला मिळाले. दरम्यान, शिना ओमप्रकाश यांनी आणि प्रताप शहा यांनी  उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुदेश नाईक यांनी अथक परिश्रम घेतले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीष वायंगणकर आणि मनीषा कृष्णाजी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज गावकर आणि समृद्धी देसाई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com