Goa Crime News : 2 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी शिवोली येथील स्थानिकाला अटक

हणजुण पोलिसांची कारवाई
Anjuna Police Arrested Person In drug Case
Anjuna Police Arrested Person In drug CaseDainik Gomantak

Goa Crime News : काही वर्षापूर्वी केवळ किनारपट्टी भागापुरता मर्यादित असलेला ड्रग्स व्यवसाय आता गोव्यात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला असून त्याचाच परिणाम म्हणजे या व्यवसायात अटक केलेल्यामध्ये 30 टक्के पेडलर्स हे गोमंतकीय सापडले आहेत. मागच्या वर्षभरात एकूण 56 गोवेकरांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवोली येथे ड्रग्स बाळगल्याप्रकरणी एका स्थानिक रहिवाश्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई हणजूण पोलिसांनी केली आहे. यावेळी संशयिताकडून 2 लाख 4 हजारांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.

Anjuna Police Arrested Person In drug Case
Mahadayi Water Dispute: हा कसला विजय, हे तर आजचे मरण जुलै पर्यंत ढकलले गेले : विजय सरदेसाई

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवोली येथे अंमली पदार्थांचा व्यवसाय होत असल्याची गुप्त माहिती हणजुण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना 23.4 ग्रॅम सायकोट्रॉपिक ड्रग्ज अवैधरित्या आढळून आले.

या ड्रग्सची किंमत 2 लाख 4 हजार रुपये एवढी आहे. पोलिसांनी नितीन बाणावलीकर (44) रा. शिवोली या संशयिताला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करत एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Anjuna Police Arrested Person In drug Case
Mahadayi Water Dispute: न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री सावंत म्हणतात...

मागच्या वर्षभरात गोवा पोलिसांनी अमली पदार्थ व्यावसायिकावर एकूण 153 गुन्हे दाखल करताना 5 कोटीपेक्षा अधिक ड्रग्स जप्त केले आहेत. त्यात 184 संशयितांना अटक करण्यात आली आहे. यातील 28 विदेशी नागरिक असून 56 गोवेकर आहेत. तर 102 व्यक्ती इतर भारतीय नागरिक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com