Anjuna: मडगावनंतर आता हणजूणात छापेमारी; 1 लाखाच्या अमली पदार्थासह एकाला अटक

बिहारच्या युवकाला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक
Anjuna
Anjuna Dainik Gomantak
Published on
Updated on

आज सकाळपासून अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन मोठ्या कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. पहिल्या कारवाईत मडगाव येथे महिलेसह पाच लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यानंतर हणजूण येथे बिहारच्या युवकाला गांजा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

Anjuna
Purple Fest 2023: गोव्यात प्रथमच दिव्यांगांसाठी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेचे आयोजन

मिळालेल्या माहितीनुसार हणजूण येथे एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. यावरुन पोलिसांनी मडगाव येथून अजित कुमार गुप्ता (28) या युवकाला अटक केली आहे. संशयित गुप्ता हा ग्राहकांना ड्रग्ज देण्यासाठी आला असता त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.

संशयित आरोपी अजीत कुमार गुप्ता यांच्याविरोधात अमली पदार्थ कायद्यांतर्गत हणजुण पोलिसांत रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक प्रशाल देसाई , म्हापसा उप-अधिक्षक जीवबां दळवी तसेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन लार्सन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Anjuna
Goa: केरी-तेरेखोल फेरीधक्का नागरिकांसाठी ठरतोय धोकादायक!

पोलिसांनी आज दिवसभरात दुसरी कारवाई केली आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई सुरु ठेवली आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. या पुढे अवैध प्रकार चालणार नाहीत. असा स्पष्ट इशारा गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिस अधिक्षकांनी पत्रकार परिषद घेत काही दिवसांपुर्वीच दिले आहेत. त्यामुळे अशा कारवाई आता सुरु राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fake ED Officer Arrested
Goa drug case accused acquitted due to investigation error
Goa Drug Case:
Goa customs hydroponic ganja seizure
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com