Anjuna Dam: अंजुणे धरणातून कालव्यात सोडले पाणी! शेतकऱ्यांत समाधान; बागायतींसाठी ठरणार उपयुक्त

Anjuna Canal Water: एरवी दसऱ्याच्या सुमारास पाणी सोडण्याची प्रथा असली तरी यावर्षी दत्तजयंतीच्या मुहूर्तावर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.
Anjuna Dam
Anjuna DamDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: केरी सत्तरी येथील अंजुणे धरणातील पाणी दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर विधिवत पूजा व गाऱ्हाणे घालून कालव्यात सोडण्यात आले. सकाळी पार पडलेल्या या विधीला डब्ल्यूआरडी खात्याचे वरिष्ठ अधिकारी दिलीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हे पाणी सोडण्यात आले. यावेळी अभियंते अनिल परुळेकर, दिलीप गावकर, अनिल फडते, पवन वरक, संकेत प्रभू, सिंथिया, जयंत बापट तसेच कृषी फोरमन समीर गावस यांची उपस्थिती होती.

यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकल्यामुळे कालव्यांमध्ये पाणी सोडण्यास विलंब झाला. एरवी दसऱ्याच्या सुमारास पाणी सोडण्याची प्रथा असली तरी यावर्षी दत्तजयंतीच्या मुहूर्तावर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यासंदर्भात, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले की, अंजुणे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

यंदा पावसाळा उशीरापर्यंत चालू राहिल्याने पाणी सोडण्यास विलंब झाला. मात्र, आज पाणी उपलब्ध झाल्याने या स्त्रोतावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी सोय झाली आहे. हे पाणी पिण्याच्या गरजांसाठी, बागायतीसाठी तसेच इतर नैसर्गिक वापरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून लोकांनी पुन्हा शेतीकडे वळले तर त्याचा खऱ्या अर्थाने मोठा फायदा होईल.

Anjuna Dam
Anjuna Cocaine Case: हणजूण कोकेन तस्करी प्रकरणी कॅमेरोनियन नागरिकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी!

पाण्याची पातळी ९२.५८ मीटर

अंजुणे धरणाची पाण्याची क्षमता ९३.२० मीटर इतकी आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी ९२.५८ मीटर इतकी आहे. गेट क्रमांक ३ मधून २ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. निश्चितपणे, परिसरातील बागायतींसाठी कालव्यात सोडलेले पाणी उपयुक्त ठरणार आहे.

Anjuna Dam
Amthane Dam: दिलासा! आमठाणे धरणाचे दुरुस्तीकाम अंतिम टप्प्यात! जलाशयात 46.5 मीटर पाण्‍याचा साठा

आमठाणे धरणात यंदा समाधानकारक जलसाठा

कोरडा गेल्यानंतर डिचोलीतील आमठाणे जलाशयात आता समाधानकारक जलसाठा आहे. बऱ्याच दिवसांनंतर या जलाशयातील जलसाठ्याची पातळी ४९ मीटरच्या एकदम जवळपास पोचली आहे. गुरुवारी (ता.४) सायंकाळपर्यंत या जलाशयातील जलसाठ्याची पातळी ४८.९० मीटर एवढी होती. पावसाळ्यात जवळपास दोन महिने कोरडे राहिल्यानंतर जलसाठा नियंत्रित असल्यामुळे पाण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही.

त्यातच स्वयंचलीत सर्व्हिस गेट बसविण्यात आल्यामुळे आता ‘पाणीबाणी' सारखी समस्या निर्माण झालीच तर पाणीपुरवठा करण्यासाठी आमठाणे जलाशय सज्ज आहे. दरम्यान, दुरुस्तीकाम लांबणीवर पडल्याने दोन महिने जलाशयातील पातळी जवळपास ५ मीटर एवढी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com