Animal Husbandry News: पशुसंवर्धन मंत्र्यांची पशुवैद्यकीय डॉक्टरांना सक्त ताकीद, म्हणाले...

अधिकार्‍यांनी फोन कॉल्सवर सक्तीने उपस्थित राहणं आवश्यक आहे
Animal Husbandry
Animal HusbandryDainik Gomantak

पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पशुवैद्यकीयडॉक्टरांना त्यांच्या गलथान कारभाराविषयी सक्त ताकिद दिलीय. हळर्णकर म्हणाले, पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयीन वेळेनंतर तसेच रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही शेतकऱ्यांनी केलेल्या कॉलला प्रतिसाद देत नाहीत अशा तक्रारींचा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

या संदर्भात हळर्णकर यांनी सर्व सहाय्यक संचालक/ पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना सक्त ताकिद दिलीय की, ‘सर्व सहाय्यक संचालक/पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी फोन कॉल्सवर सक्तीने उपस्थित राहणं आवश्यक आहे. अन्यथा संबंधीत अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल’ असे त्यांनी म्हटले आहे.

Animal Husbandry
Nagesh Karmali: स्वातंत्र्यसैनिक करमली अनंतात विलीन; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली

दरम्यान गोव्यात गुरांना लम्पी रोगाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या असून या रोगामुळे गुरे दगावण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे सहाजिकच दूध उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे.

त्यामुळे सरकारने लंपी रोगाचा मुकाबला करताना युद्धपातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी दूध उत्पादकांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पशुसंवर्धन डॉक्टरांना दिलेले आदेश योग्य असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com