Goa made liquor Seized
Goa made liquor SeizedDainik Gomantak

अनमोड येथे गोवा बनावटीचे मद्य जप्त; कर्नाटकच्या अबकारी खात्याची कारवाई

दोघा संशयितांना अटक
Published on

Goa-made liquor allegedly smuggled : गोवा बनावटीच्या मद्याची आंध्र प्रदेशमध्ये बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना कर्नाटकच्या अबकारी खात्याने अटक केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण 7 लाखांचे मद्य जप्त करण्यात आले आहे.

Goa made liquor Seized
मोठी बातमी! गोवा सरकारकडून मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्काराची घोषणा, मिळणार पाच लाखांचे बक्षीस

याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून आंध्र प्रदेशमध्ये बेकायदा पध्दतीने गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक एका टॅम्पो ट्रक मधून होत होती. यावेळी हे वाहन अनमोड येथे कर्नाटक अबकारी चेक पोस्टवर तपासणीसाठी थांबविण्यात आले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता वाहनांत क्रेटमध्ये गोवा बनावटीचे मद्य आढळून आले.

कर्नाटकच्या अबकारी खात्याने हे मद्य जप्त केले असून याची किंमत 7 लाख 65 हजार 280 रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलिस पुढीत तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com