Amrit Bharat Station Scheme : ‘अमृत भारत स्टेशन’ अंतर्गत रेल्वे स्थानकांचा विकास; वास्को, सावर्डेत सुविधांचे आधुनिकीकरण

Amrit Bharat Station Scheme : वार्षिक अर्थसंकल्पात केंद्राच्या ‘अमृत भारत योजने’तर्गत पुनर्विकासासाठी राखून ठेवलेल्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या ५१ रेल्वे स्थानकांच्या यादीत वास्को रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.
goa
goaDainik Gomantak

Amrit Bharat Station Scheme :

वास्को, केंद्राच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवार (दि.२६ फेब्रुवारी) रोजी वास्को रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली.

वार्षिक अर्थसंकल्पात केंद्राच्या ‘अमृत भारत योजने’तर्गत पुनर्विकासासाठी राखून ठेवलेल्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या ५१ रेल्वे स्थानकांच्या यादीत वास्को रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.

ज्यामध्ये ओव्हरब्रिज आणि अंडरपास बांधणे यासह सुविधांचे आधुनिकीकरण करणे, प्रवासाचा दर्जा सुधारणे आणि सोयी वाढवणे हे उद्दिष्ट आहे. एकूण १५५ कोटींहून अधिकच्या निधीचे रेल्वे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राष्ट्राला समर्पित केले.

goa
Goa Police : पोलिस प्रशिक्षणार्थींना बढतीची संधी! मुख्यमंत्री

वास्को रेल्वे स्थानकावर आयोजित सोहळ्यात राज्यपाल श्रीधरन पिल्लई, परिवहनमंत्री माविन गुदिन्हो, खासदार सदानंद शेट तानावडे, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, अध्यक्ष मुरगाव बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष विनोद कुमार आणि मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर तसेच रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

देशातील ५५४ रेल्वे स्थानकाचे पुनर्निर्माण आणि १५०० रोड ओव्हरब्रीज, अंडरपास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. या योजनेत गोव्यातील सावर्डे आणि वास्को रेल्वे स्थानकाच्या पायाभरणी सोहळ्याचा समावेश होता.वास्को रेल्वे स्थानकांची पुनर्निर्माण पायाभरणी फलकाचे अनावरण राज्यपाल श्रीधरन पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.

goa
Goa Accident : राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच!

अमृत भारत योजनेतून वास्को रेल्वे स्थानकांवर ८० कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत.तर सावर्डे रेल्वे स्थानकावर १५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

प्रत्येक सामान्य रेल्वे प्रवाशाला जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. त्याच्या अनुषंगाने, सर्व प्रमुख स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. अमृत ​​भारत हे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे धोरण आहे.

-पी.एस.श्रीधरन पिल्लई, राज्यपाल गोवा

वास्कोचा आमदार या नात्याने, वास्को रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि लवकरच सुरू होणाऱ्या कदंब बसस्थानकाचे बस पोर्टमध्ये रूपांतर झाल्यामुळे मला आनंद झाला आहे. या दोन्ही गोष्टी या बंदर शहराच्या भविष्याला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील.

-कृष्णा साळकर, आमदार वास्को

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com