काँग्रेसच्या काळात बंद झालेल्या खाणी येत्या सहा महिन्यांत सुरू करू: अमित शहा

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या डंप पॉलिसीनुसार राज्यातील सर्व खाणींचा पारदर्शी लिलाव करून खाणी सुरू करण्यात येतील
Dinesh Gundu Rao on Amit Shah
Dinesh Gundu Rao on Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काँग्रेसच्या काळात बंद झालेल्या खाणी येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येतील. यासाठी गेल्या 2 वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू होते. आता यातून मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या डंप पॉलिसीनुसार राज्यातील सर्व खाणींचा पारदर्शी लिलाव करून खाणी सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल वास्को येथे केली. (Amit Shah promises to start goa mining in next six months)

Dinesh Gundu Rao on Amit Shah
मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशाला 75,000 रुपयांचा गंडा

विधानसभा निवडणुकीच्या Goa Assembly Election पार्श्वभूमीवर गोव्यात फोंडा, सावर्डे आणि वास्को येथे शहा यांनी आज जाहीर प्रचार केला. त्यांच्या प्रचाराची सुरुवात शिरोडा मतदारसंघातील बोरी येथील साईबाबा मंदिरात देवदर्शनाने झाली. तेथे त्यांनी शिरोडा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुभाष शिरोडकर यांचा प्रचार केला. त्यानंतर त्यांनी फोंडा Ponda येथे सनग्रेस सभागृहात प्रचार सभा घेतली. येथे त्यांनी फोंड्याचे उमेदवार रवी नाईक यांना निवडून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी सावर्डे येथे भाजप उमेदवार गणेश गावकर यांचा प्रचार केला. आजच्या प्रचाराची सांगता वास्को Vasco येथील रेल्वे सभागृहात केली. यावेळी मुरगाव आणि वास्को मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिलिंद नाईक, कृष्णा ऊर्फ दाजी साळकर, नारायण नाईक आणि माविन गुदिन्हो उपस्थित होते.

सर्जिकल, एअर स्ट्राईकचा पुनरुच्चार

यावेळी शहा यांनी केंद्र सरकारच्या कामाची स्तुती केली. केंद्र सरकारने देश सुरक्षित, विकसित आणि एकजूट केल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी शेजारील देश भारतीय सैन्याचा अपमान करत होता. पुरी आणि पुलवामा यासारख्या घटना घडवत होता. त्याचे उत्तर सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून त्यांच्या घरात घुसून दिले. शिवाय 370 कलम रद्द करून देशाची एकजूट केली. गोव्यात पुन्हा एकदा भाजप सरकार समृद्धीची मुहूर्तमेढ रोवत असून यासाठी गोवेकरांनी बहुमताने भाजप सरकारला निवडून द्यावे, असे आवाहन शहा Union Home Minister Amit Shah यांनी केले आहे.

Dinesh Gundu Rao on Amit Shah
गोव्यात आजपासून 15-18 वयोगटातील मुलांना मिळणार लसीचा दुसरा डोस

‘अम्ब्रेला कॅम्पेन’ प्रचार मोहिमेचे उद्‍घाटन

भाजपच्या ‘अम्ब्रेला कॅम्पेन’ प्रचार मोहिमेचे उद्‍घाटन शहा यांच्या हस्ते वास्को येथे करण्यात आले. यावेळी जाहीर सभेत शहा यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. काही राजकीय पक्ष पर्यटनासाठी गोव्यात आले असून त्यांना या निवडणुकीत दारूण अपयशाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. या सभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, रेल्वे राज्यमंत्री दर्शना जर्दोश, गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना ‘बुस्ट’

एकूणच शहा यांच्या चार ठिकाणचा भाजप प्रचार कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारा ठरला. यावेळी शहा यांनी तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष यांच्याबरोबर काँग्रेसवरही टीकास्त्र सोडत भाजपने केलेल्या विकासाचा आढावा घेतला. यापूर्वीचे काँग्रेसचे सरकार म्हणजे अराजकता, अस्थिरता आणि अव्यवस्था यावर बेतलेले होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत गोव्यात भाजपला विविध क्षेत्रांत करोडो रुपयांची विकासकामे आणि सामाजिक कल्याणाच्या योजना राबवल्याचे शहा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com