Amit Shah In Goa: गृहमंत्री अमित शहा शनिवारी गोव्यात; 'माझे घर' योजनेचा होणार शुभारंभ

Amit Shah Goa Visit: कार्यक्रमाच्या ठिकाणी घर नियमित करण्याच्या विविध योजनांचे अर्ज वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Amit Shah to launch Maza Ghar scheme In Goa
Amit Shah In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी पाच तासांसाठी गोव्यात येणार असून यानिमित्ताने राज्य सरकारने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्यभरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (३० सप्टेंबर) केले.

नागरिकांसाठी प्रत्येक पंचायत क्षेत्रातून दुपारी दोन वाजता बस सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाचा तपशील जाहीर केला त्यांनी सांगितले, की प्रामुख्याने 'माझे घर' या योजनेचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते साडेचार वाजता केला जाणार आहे.

Amit Shah to launch Maza Ghar scheme In Goa
गोव्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून स्वाक्षरी मोहीम

कार्यक्रमाच्या ठिकाणी घर नियमित करण्याच्या विविध योजनांचे अर्ज वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनांचे लाभार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे सरकारला अपेक्षित आहे.

Amit Shah to launch Maza Ghar scheme In Goa
Viral Video: नवरात्रीसाठी फ्लाईटमुळे उशीर झाला गुजराती प्रवाशांनी 'गोवा' विमानतळावरच सुरु केला गरबा; पायलट, हवाई सुंदरीही थिरकल्या Watch

सनदांसह प्रमाणपत्रांचे वाटप

या कार्यक्रमात 'माझे घर' या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. याशिवाय घरे नियमित केलेल्या ११ जणांना सनदांचे वाटप, १९७२ पूर्वीची घरे नियमित केलेल्या दोघांना प्रमाणपत्रे, पंचायत आणि पालिका पातळवरील घरे नियमित केल्याची चारजणांना प्रमाणपत्रे तसेच कोमुनिदाद जमिनीवरील घरे नियमित करण्यासाठी दोघांना अर्जाचे वाटप शहा यांच्या हस्ते केले जाणार आहे.

स्वयंपूर्ण मित्रांचाही होणार गौरव

१) याच कार्यक्रमात चांगले काम केलेले पाच स्वयंपूर्ण मित्र, उत्तर व दक्षिण गोव्यातील प्रत्येकी दोन पंचायती व पालिका तसेच राज्यात सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगले काम केलेल्या बँकेला, शहा यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

२) राज्य कर्मचारी भरती आयोगाने निवडलेल्या २३० जणांना नोकरीची नियुक्तीपत्रे या कार्यक्रमात देण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com