Chimbel Accident: चिंबल महामार्गावर रुग्णवाहिका उलटली; चालक, परिचारिका सुखरूप; अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा

Chimbel highway Ambulance Accident: चिंबल महामार्गावर आज शनिवारी दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास सरकारी रुग्णवाहिकेला अपघात होऊन ती रस्त्यावर उलटली.
Chimbel highway Ambulance Accident
Chimbel AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चिंबल महामार्गावर आज शनिवारी दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास सरकारी रुग्णवाहिकेला अपघात होऊन ती रस्त्यावर उलटली. या दुर्घटनेत रुग्णवाहिकेतील चालक आणि परिचारिका बचावले असून, दोघांनाही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे काही काळ घटनास्थळी वाहतुकीचा खोळंबा झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुग्णवाहिका चालक हिमांशू मंपाळ हे रुग्णवाहिका घेऊन पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेने परतत होते. चिंबल महामार्गावर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटली. अपघाताची तीव्रता लक्षात घेता रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने त्यावेळी वाहनात असलेले चालक आणि परिचारिका गंभीर जखमी झाले नाहीत.

Chimbel highway Ambulance Accident
Goa Sports: 'गोव्यातून ऑलिंपियन घडवायचाय'; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे लक्ष्य, क्रीडा शिक्षकांना संघटनांशी समन्वय साधण्याचे आवाहन

चौकशी होणार!

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास केला जात आहे. रस्त्याची स्थिती, वाहनाचा वेग किंवा अन्य कोणता घटक यामुळे अपघात झाला का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com