Amazon Investment In India: भारतात 35 अब्ज डॉलर गुंतवणूक, अमेझॉनची घोषणा; देशात 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार

Amazon Investment: जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात पुढील पाच वर्षांत ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा अॅमेझॉनने केली आहे.
Amazon Investment In India
Amazon Investment In IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात पुढील पाच वर्षांत ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा अॅमेझॉनने केली आहे. भारतात ‘एआय’ क्षमतांचा विस्तार, लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा वाढवणे, लहान व्यवसायांच्या वाढीला पाठिंबा देणे आणि रोजगार निर्माण करणे यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामुळे २०३० पर्यंत अतिरिक्त दहा लाख नोकऱ्या निर्माण करण्यास आणि निर्यातवाढीला मदत होईल, असे अॅमेझॉनने म्हटले आहे.

संभव शिखर परिषदेत अॅमेझॉनचे उदयोन्मुख बाजारपेठांचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी ही घोषणा केली. अॅमेझॉनने २०१० पासून आतापर्यंत भारतात ४० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कंपनीने २०२३ मध्ये २६ अब्ज डॉलरची गुंतवणूक जाहीर केली.

आता २०३० पर्यंत आणखी ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या नव्या गुंतवणुकीमुळे २०३० पर्यंत भारतातील विक्रेत्यांची निर्यात २० अब्ज डॉलरवरून ८० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्यास मदत होईल, असे यावेळी अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी अॅमेझॉनने अॅपरल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियासोबत भागीदारी जाहीर केली.

Amazon Investment In India
Goa Nightclub: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर; कळंगुट, बागात जागा मिळेल तेथे क्‍लब, सामान्य नागरिक हैराण!

अग्रवाल म्हणाले, ‘‘कीस्टोन अहवालानुसार, कंपनीने आतापर्यंत भारतात ४० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे आणि ती भारतातील सर्वांत मोठी परदेशी गुंतवणूकदार आहे. या गुंतवणुकीतून आम्ही लाखो भारतीयांसाठी सहज ‘एआय’ उपलब्ध होण्यावर भर देणार आहोत.’’

कंपनीने भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्यामध्ये पूर्तता केंद्रे, वाहतूक जाळे, डेटा सेंटर, डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकास यांचा समावेश आहे. भारतात २०२४ मध्ये अंदाजे २८ लाख प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि हंगामी रोजगारनिर्मिती झाली असून, १.२ कोटींहून अधिक लघु व्यवसायांचे डिजिटलायझेशन झाले आहे; तसेच २० अब्ज डॉलरच्या ई-कॉमर्स निर्यातीला चालना मिळाली आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

मायक्रोसॉफ्टने २०३० पर्यंत भारतात डेटा सेंटर, एआय आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी १७.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर लगेचच अमेरिकेतील ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. यापूर्वी, गुगलने पुढील पाच वर्षांत ‘एआय’ डेटा सेंटर बांधण्यासाठी १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते.

Amazon Investment In India
Goa Crime: अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करून मुंबई येथे अत्‍याचार, संशयित पसार; पोलिसांकडून शोध सुरू

अदानींकडून महागुंतवणुकीची घोषणा

अदानी उद्योगसमूह पुढील सहा वर्षांमध्ये देशभरात बारा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा या उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज केली. पायाभूत सोयी-सुविधा, उत्खनन, अपारंपरिक ऊर्जा आणि बंदरे आदी क्षेत्रात हा उद्योगसमूह काम करेल. देशामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी असून आम्ही त्यांचा शोध घेऊ, असे अदानी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com