Babush Monserrate: पणजीत मी खोदकाम करत आहे का? यात माझा काय दोष? महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात भडकले

इंजिनिअर्सचा दोषी धरणार; खोदकामांवरून पत्रकारांनी विचारला होता प्रश्न
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

Babush Monserrate: पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे शहरात वाहनधारकांना वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामामुळे त्यात भर पडली आहे.

त्यावरूनच राज्याचे महसूल मंत्री आणि पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. पण त्यावर मोन्सेरात पत्रकारांवर भडकल्याची घटना घडली आहे.

Babush Monserrate
Ponda Development : विकास प्रस्तावांना केवळ १५ दिवसांत मंजुरी

पणजीतील खोदकामांबाबत प्रश्न विचारल्यावर मंत्री मोन्सेरात भडकले. ते म्हणाले की, मी आमदार आहे. मी रस्ता खोदत आहे का? इंजिनिअर्स काम करत आहेत. मी याचा दोष घेणार नाही. या कामासाठी मी त्यांना जबाबदार धरणार आहे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

गोवा हे राज्य देशाची पर्यटन राजधानी म्हणून ओळखला जातो. देशविदेशातील पर्यटक नियमितपणे गोव्याला भेट देत असतात. याच गोव्याच्या राजधानीची अवस्था मात्र अलीकडच्या काळात अगदी वाईट झाली आहे. त्याचे कारण आहे, पणजी शहरात सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे.

Babush Monserrate
Fire In Goa: होंडा येथील VGS कंपनीत आग, 5 ते 10 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज

या कामांमुळे पणजीतील रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी एकाचवेळी रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. त्याचा परिणाम पणजी शहरातील वाहतुकीवर झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असून आता विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू झाल्याने पणजीतील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com