Nashik: नाशिकमधून गोव्यासह इतर तीन ठिकाणी थेट विमानसेवा सुरू, पाहा सविस्तर वेळापत्रक आणि तिकीटदर

नाशिकमधून गोव्यातील मोपा येथील मनोहर विमानतळावर फ्लाईट्स उतरतील.
Indigo Flight From Nashik
Indigo Flight From NashikDainik Gomantak

Flights From Nashik: नाशिकमधून गोव्यासह नागपूर व अहमदाबाद या शहरासांठी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. इंडिगो (Indigo) कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेला बुधवार (दि.15) पासून प्रारंभ झाला.

नाशिकमधून कंपन्यांनी सेवा सुरू करावी, यासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राकडून पाठपुरावा सुरू होता. याच पार्श्वभूमीवर हवाईसेवेतील नामवंत अशा ‘इंडिगो’ने नाशिकमध्ये सेवा देण्याचे निश्चित केलंय. नाशिकमधून गोव्यातील मोपा येथील मनोहर विमानतळावर फ्लाईट्स उतरतील.

असे आहे वेळापत्रक (Indigo Flight From Nashik)

- नाशिक ते उत्तर गोवा सकाळी 11.20 दुपारी 1.10 आणि उत्तर गोवा ते नाशिक दुपारी 1.40 दुपारी 3.25

- नाशिक ते अहमदाबाद दुपारी 3.45 सायंकाळी 5.25 आणि अहमदाबाद ते नाशिक सायंकाळी 5.50 सायंकाळी 7.15

- नागपूर ते नाशिक सकाळी 9.15 सकाळी 11.00 आणि नाशिक ते नागपूर सायंकाळी 7.35 रात्री 9.25

- हैदराबाद ते नाशिक (व्हाया नागपूर) सकाळी 7.20 सकाळी 11.00 आणि नाशिक ते हैदराबाद (व्हाया नागपूर) सायंकाळी 7.35 रात्री 11.40

Indigo Flight From Nashik
Smart Panaji: स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका, दिव्यांग व्यक्ती गाडीसह कलंडला खड्ड्यात

असे आहेत तिकीटदर

नाशिकमाधून विमानाने प्रवास करण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे भाडे मोजावे लागेल. अहमदाबाद- 2,776 रुपये, नागपूर- 3,299 रुपये, गोवा- 3,406 रुपये.

नाशिकमधून थेट विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना आता गोव्यासह नागपूर व अहमदाबाद या तीन ठिकाणांना थेट कनेक्टिव्हिटीही मिळणार आहे. दरम्यान, थेट हैदराबाद सेवेसाठी मात्र नाशिककरांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com