Goa News : शिक्षणाबरोबरच भोवतालचे ज्ञान तसेच अनुभव तेवढेच मोलाचे : गोविंद गावडे

Goa News : मठग्रामस्थ हिंदू सभेच्या विद्यालयांचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा, मान्यवरांचा सत्कार
Goa
GoaDainik Gomantak

Goa News : सासष्टी,आजच्या जगात शिक्षणाला पुष्कळ महत्त्व आहे. प्रत्येकाला शिक्षण हवेच. तसेच भोवतालचे ज्ञान व अनुभवही तेवढेच मोलाचे असतात, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.

मठग्रामस्थ हिंदू सभेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बक्षिस वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्रीमती बेला नायक (निवृत्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश) या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

मंत्री गावडे यांनी पुढे सांगितले की, अनुभव हा प्रत्येकाला महत्त्वाचा असतो व तो भरपूर वाचनाने मिळत असतो. जीवनात यश सहज गाठता येत नसते. कठोर परिश्रम करावे लागतात, अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते व योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे धैर्य दाखविणे सुद्धा तेवढेच गरजेचे असते असे ते म्हणाले.

मनावर ताबा ठेवून ते चंचल होऊ देऊ नये, कामात प्रामाणिकपणा असावा हे गुण आत्मसात करावे असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी मठग्रामस्थ हिंदू सभेच्या सामाजिक कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. ही संस्था समाजाला आपण काही तरी देणे लागतो या भावनेने काम करते हे पुष्कळ महत्त्वाचे असल्याचे व स्मशानभूमी चालवण्याची सेवा ही मोठी सेवा असल्याचे त्यांनी खास नमुद केले.

मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग ऊर्फ भाई नायक यांनी स्वागत केले व आपली संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास भर देत असल्याचे सांगितले. आता शाळेमध्ये स्टेलर अकादमीतर्फे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केल्याचे त्यांनी जाहीर केले.

Goa
Goa Chess Association: ऋत्विज परब रॅपिड बुद्धिबळात विजेता; सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई

सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले. दामोदर विज्ञान उच्च माध्यमिकचे प्राचार्य राजीव देसाई यांनी आभार व्यक्त केले. सुरवातीला शिक्षकांनी ध्वज गीत सादर केले.

या सोहळ्यात डॉ. दीपक लवंदे तसेच निवृत्त शिक्षक उपेंद्र मडकईकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या शिक्षिका ज्योयरीस फर्नांडिस व प्रयोगशाळा असिस्टंट संदेश च्यारी यांचा निवृत्तीसाठी सन्मान करण्यात आला.

पालक, शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : नायक

निवृत्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश बेला नायक यांनी विद्यार्थ्यांसाठी पालक, शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्याच बरोबर यश संपादन करण्यास स्वतः विद्यार्थीच जबाबदार असतो.

शिक्षण ही कधी न संपणारी प्रक्रिया असून स्वतःचे अंतरी असलेले गुणांची पारख करून पुढे गेल्यास यश संपादन करण्यास जास्त त्रास होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षणाकडे पाहताना दृष्टिकोन सभ्यता व नम्रतेचा आसावा हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com