Almeida school Ponda: फोंडा तालुक्यातील आल्मेदा शाळेत विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणानिमित्त हातावर बांधण्यात आलेली राखी काढण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला होता. शाळेत विद्यार्थ्यांना हातावरील राखी काढायला लावली गेल्याचे समोर येताच पालकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
याप्रकरणी आज बजरंग दलाने मुख्याध्यापिका यांना घेराव घातला. त्यानंतर अखेर मुख्याध्यापिका यांनी पालकांची माफी मागितली आहे.
पालकांना 31 ऑगस्ट रोजी पाठवलेल्या नोटीसमागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. भविष्यात आम्ही विद्यार्थ्यांना घरात हातावर बांधलेली राखी बांधून येण्याची परवानगी दिली जाईल. असे स्पष्टीकरण शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका यांनी दिले आहे. याबाबतचा संदेश त्यांनी पालकांच्या ग्रुपवरती पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, त्यापूर्वी बजरंग दलाच्या वतीने मुख्याध्यापिका यांना घेराव घालण्यात आला. विद्यार्थ्यांना राखी बांधून शाळेत येऊ नये अशी सूचना केल्याप्रकरणी जाब विचारला.
फोंडा येथील आल्मेदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेच्या नावाने संदेश पाठवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत येतांना हातात राखी न बांधण्यास सांगण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी हातात राखी बांधून आलेल्यांना त्या काढण्यास भाग पाडण्यात आले.
शाळेने सर्व पालकांची माफी मागितली पाहिजे. तसेच यात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी रणरागिनी संघटनेतर्फे करण्यात आली होती. अखेर शाळेने पालकांची माफी मागितली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.