Goa: आधीच मंदी त्यात आभाळ फाटले..!

Goa: भामई पुलार बाजारपेठ उद्ध्वस्त, महापुरामुळे झाले होत्याचे नव्हते
Goa: Shopkeepers removing damaged items in a market shop
Goa: Shopkeepers removing damaged items in a market shopDainik Gomantak

पाळी : गेल्या शुक्रवारी (Friday) आलेल्या महापुरामुळे (Flood) बऱ्याच लोकांचे होत्याचे नव्हते झाले असून मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने या आपद्ग्रस्तांचे सर्वस्व हिरावल्यातच जमा आहे. भामई - पाळी उसगाव (Bhamai - Pali Usagao) येथील जुन्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे (Shopkeepers) अतोनात नुकसान झाले आहे. बाजारपेठेतील दोन दुकाने (Two Shops) जमीनदोस्त झाली असून अन्य दुकानांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. बाजारपेठेतील नुकसान लाखो रुपयांच्या घरात आहे.

Goa: Shopkeepers removing damaged items in a market shop
Goa: विश्वजित कृष्णराव राणेंनी केली पर्येंत मदत

अन्य दुकानांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. बाजारपेठेतील नुकसान लाखो रुपयांच्या घरात आहे. भामई पुलार बाजारपेठ एककाळ या भागातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जायची. आठवड्याचा साप्ताहिक रविवार बाजार प्रसिद्ध होता. मिठापासून पिठापर्यंत, कपड्यापासून धान्यापर्यंत सर्व वस्तू बाजारपेठेत उपलब्ध केल्या जायच्या. आठवड्याच्या बाजाराला ग्राहकांची मोठी गर्दी व्हायची, पण नंतरच्या काळात या बाजारपेठेला घरघर लागली आणि आता तर नुसती नावाची बाजारपेठ शिल्लक राहिली आहे. नवीन चौपदरी पूल उभारल्यानंतर बाजारपेठेतील वाहतूक मंदावली आहे. त्यातच खाण बंदीचा फटका आणि नंतर कोरोनाने दिलेला दणका यामुळे व्यापारी वर्गाचे कंबरडेच मोडले आहे. बाजारातील दुकाने उघडून बसलो तरी कधी कधी ‘बोणीच' होत नसल्याच्या प्रतिक्रिया येथील व्यापारी सांगतात. चार दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामुळे तर होते नव्हते सगळे उद्ध्वस्त झाले असून आता दुकानात साचलेला चिखल आणि कचरा काढण्यासाठी हजारो रुपये खर्चावे लागत असल्याचे हे दुकानदार पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com