सर्व प्रकल्प डिसेंबरपूर्वीच पूर्ण करणार: मुख्यमंत्री सावंत

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी मांद्रे येथे आपत्कालीन निवारा सोय प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
Chief Minister Dr. Pramod Sawant
Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak

मोरजी: मांद्रे मतदार संघातील (Mandre constituency) जे उर्वरित किंवा अर्धवट प्रकल्प आहेत किंवा आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांची विकास कामे प्रकल्प असतील ते सर्व प्रकल्प डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी मांद्रे येथे आपत्कालीन निवारा सोय प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, अधिकारी प्रमोद बदामी, मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर, पार्से सरपंच प्रगती सोपटे , मोरजी उपसरपंच अमित शेटगावकर, पंच विलास मोरजे, पंच तुषार शेटगावकर, मांद्रे पंच संतोष बर्डे, केरी माजी सरपंच सौ केरकर, सरपंच सुरज नाईक, प्रशांत नाईक, पंच डेनिस ब्रिटो भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब आदी उपस्थित होते.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa: डॉ.प्रमोद सावंत यांचे सकुरच्या सरपंचाची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पुढे बोलताना या प्रकल्पाचा वापर नागरिकांनी जास्तीत जास्त करावा, असे आवाहन केले. असे एकूण 14 प्रकल्प आहेत त्यातला पहिला प्रकल्प आमदार दयानंद सोपटे यांनी पुढाकार घेतल्याने हा प्रकल्प पूर्ण व्हायला मदत झाली. सकारात्मक विचार असेल तर आमदार सोपटे सारख्या आमदरामुळे असे प्रकल्प रखडले जात नाही. आमदार दयानंद सोपटे याना आमदार म्हणून एखादा प्रकल्प रखडेल म्हणून भीती वाटणे साहजिकच आहे परंतु आमदार सोपटे यांचे कोणतेच प्रकल्प रखडले जाणार नाही . त्यांनी पुन्हा यादी किंवा आठवण करून द्यावी, डिसेंबर पूर्वी प्रकल्प पूर्ण केले जातील असे त्यांनी सांगितले.

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना काही विरोधक विनाकारण टीका करतात, हा प्रकल्प उभारताना स्थानिकाना विश्वासात घेवून प्रकल्प उभारला गेला, काही विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत असतात असे सांगून तुये येथील हॉस्पिटल इमारत आणि त्यात सोयी सुविधा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांच्या सहकार्यातून उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून तुये येथे आयटी प्रकल्प लवराकच सुरु होणार असल्याचे आमदार सोपटे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com